स्पर्धा परीक्षेचा नाद सोडला अन् आयुष्यात चहाने आणला गोडवा; महिन्याला १ लाख कमाई By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 12:45 PM 2023-02-25T12:45:51+5:30 2023-02-25T12:52:20+5:30
स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी तरुण रात्रंदिवस एक करत अभ्यास करतात. परंतु रिक्त जागाच निघत नसल्याने उत्तीर्ण होऊनही अनेकांच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत. MPSC उत्तीर्ण होऊन ३ वर्ष झाले तरी २१५ अभियंते नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत.
त्यामुळे आता उच्च शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भविष्य घडवणाऱ्या विद्यार्थ्यांनी जागा निघत नसल्यामुळे स्पर्धा परीक्षेचा सराव थांबवला अन् व्यवसाय करायचा असा निर्णय २ मित्रांनी घेतला. दोघांनी मिळून नागेश्वरवाडी भागात चहाचा कॅफे सुरू केला आहे.
चहाच्या विक्रीतून महिन्याकाठी ते १ लाख २५ हजाराहून अधिक कमाई करू लागले. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा या गावचे शुभम तळणीकर आणि संकेत पालवे. दोघांचं शालेय शिक्षण गावामध्येच पूर्ण झालं.
उच्च शिक्षणासाठी औरंगाबाद मध्ये आला संकेत याने बीएससी चा शिक्षण औरंगाबाद मधील पूर्ण केलं त्यानंतर स्पर्धा परीक्षेचा सराव करण्यासाठी पुणे येथील क्लासेस मध्ये शिकवणी करू लागला दोन-तीन वर्ष सराव केल्यानंतर स्पर्धा परीक्षांच्या जागा निघत नव्हत्या.
तर त्याचवेळी शुभम तळणीकर हा बीकॉम चे शिक्षण पूर्ण करून पंजाब येथील एका कंपनीमध्ये मार्केटिंगचा जॉब करू लागला. या जॉब मध्ये मिळणाऱ्या पगारातून शुभम समाधानी नव्हता. आणि अशातच कोरोनाचा संसर्गजन्य आजार आला आणि लॉकडाऊन लागलं.
दरम्यानच्या काळामध्ये संकेत स्पर्धा परीक्षेच्या जागा निघत नसल्यामुळे व्यवसाय करायचा निर्णय घेतला. यासाठी त्याने शुभम याला कॉल केला त्यावेळेस व्यवसाय करण्यास होकार दिला. दोघांनी एकत्रित विचार करून औरंगाबाद शहरांमध्ये पुढचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
स्पर्धा परीक्षेचा हब झालेल्या औरंगाबाद मध्ये चहा पिणाऱ्यांची संख्या अधिक आहे यामुळे चहाचा कॅफे सुरू करण्याचा निर्णय घेतला यासाठी नागेश्वर वाडी येथे जागा बघून तीन लाख रुपये खर्च करून सेटअप उभारला. दोघही व्यावसायिक क्षेत्रामध्ये नव्या असल्यामुळे त्यांना कसलाच अंदाज नव्हता.
कॅफे सुरु करून तीन महिने झाले होते मात्र प्रतिसाद मिळत नव्हता यामुळे कॅफे सुरू करून लावलेला खर्च करून आपण चुकीचा निर्णय तर घेतला नाही ना असा प्रश्न शुभम आणि संकेत या दोघांना पडला होता.
मात्र दर्जेदार चहाची कॉलेटी असल्यामुळे संयम आणि सातत्य ठेवण्याचा निर्णय दोघांनी घेतला हळूहळू सोशल मीडियाच्या माध्यमातून कॅफेची प्रसिद्धी झाली. ग्राहक त्यांच्याकडे येऊ लागले. चाय मेकर कॅफे सुरू करून आता सात महिने झाले आहेत. सध्या महिन्याचा टर्नर एक लाख २५ हजार एवढा आहे.