रतन टाटांनी १५ मिनिटं वेळ दिली अन् 'या' दाम्पत्याचं संपूर्ण आयुष्यच बदललं; ‘संधीचं सोनं’ कसं झालं? वाचा By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 03:47 PM 2021-07-15T15:47:57+5:30 2021-07-15T15:56:53+5:30
Startup grew from Rs 70,000 to Rs 2 Cr turnover in just 2 years: प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांची प्रेरणादायी गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु आज रतन टाटामुळे एका दाम्पत्याचं संपूर्ण आयुष्यचं बदलल्याची ही खरी गोष्ट वाचा सध्या बिहार-झारखंडसह अनेक राज्यात रेपोस एनर्जी डिझेलच्या होम डिलिवरीचा व्यवसाय करते. तुम्हाला कदाचित याची कल्पना नसेल की या उद्योगालाही प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्याकडून प्रोत्साहन मिळालं आहे.
रेपोस एनर्जीचे संस्थापन चेतन वाळूंज आणि आदिती भोसले वाळूंज यांच्या डोक्यात डिझेलचं होम डिलिवरी करण्याची संकल्पना आली. परंतु चहुबाजूने नकारात्मक गोष्टी ऐकायला मिळाल्या. ज्यांना ही कल्पना ऐकवली त्यांनी याची खिल्ली उडवत निरुत्साह दिला.
याच दरम्यान त्यांनी ठरवलं की आपली ही नवी संकल्पना घेऊन प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांची भेट घ्यायची. त्यांनी रतन टाटा यांना पत्र लिहिलं आणि त्यांच्याकडून सल्ला मागितला. जर रतन टाटांनी आर्थिक मदत केली तर खूपचं चांगलं होईल असं या दोघांना वाटलं.
एकेदिवशी चेतन आणि आदिती त्यांची संकल्पना घेऊन रतन टाटा यांना भेटण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर गेले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाट पाहत बसले. परंतु रतन टाटा यांच्याकडून कोणताही संदेश मिळाला नाही. वाळूंज दाम्पत्य निराश होऊन घरी परतले.
काही दिवसांनी वाळूंज यांच्या घरातील फोन वाजला. फोन उचलल्यावर समोरून आवाज आला, आदितीशी बोलू शकतो का? मी रतन टाटा बोलतोय. तुम्ही पत्रात १५ मिनिटं भेटण्याची वेळ मागितली होती. कृपया तुम्ही एक दिवस भेटायला येऊ शकता का? तेव्हा आदितीनं तात्काळ होकार दिला.
आदितीनुसार, ती १५ मिनिटांची भेट ३-४ तासापर्यंत कसी झाली कळालंच नाही. आमची संकल्पना पाहून रतन टाटा खूप प्रभावित झाले. वाळूंज दाम्पत्यांच्या इच्छेनुसार रतन टाटा यांच्याकडून त्यांना खूप प्रकारे मदत कायम मिळत राहिली.
रेपोस एनर्जी सध्या मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, झारखंड येथील जवळपास १५० शहरांमध्ये होम डिलिवरी करत आहेत. शेतकरी असो वा उद्योगपती डिझेलचा वापर जनरेटर, सिंचनाची मशीन सारख्या अनेक वस्तूंसाठी होतो. त्यांच्यासाठी रपोस एनर्जी काम करते.
प्रतिलीटर ४० पैसे जास्त आकारून कंपनी डिझेलची होम डिलिवरी करते. आतापर्यंत १५०० हून अधिक ग्राहक कंपनीशी जोडले आहेत. जे दरदिवशी डिझेल मागवतात. प्रतिदिन २ ते ४ हजार लीटर डिझेलची मागणी होते. कंपनीचे २०१६ मध्ये केवळ २ कर्मचारी होते आज ४०० हून अधिक कर्मचारी रेपोसमध्ये कामाला आहेत.
भारतापासून दक्षिण आफ्रिकेपर्यंत सगळीकडे हा व्यवसाय नेण्याचं लक्ष्य वाळूंज दाम्पत्याचे आहे. जेव्हा ही संकल्पना वाळूंज यांच्या डोक्यात आली तेव्हा केंद्र सरकारही हा विचार करत होतं. केंद्राच्या अनेक अधिकाऱ्यांशीही वाळूंज यांनी भेट घेतली होती.
चेतन आणि आदिती यांच्याकडे कौटुंबिक इतर उद्योगधंदेही होते. परंतु ते सोडून दोघांनी नवीन आणि अनोखा व्यवसाय करण्याचा विचार केला. इतक्यावरच ते थांबले नाहीत तर त्यासाठी प्रचंड मेहनत घेऊन त्या व्यवसायाला चालना दिली आहे. त्यांच्या आयुष्यातील रतन टाटा यांची ती १५ मिनिटांची भेट टर्निंग पॉंईट ठरल्याचं ते म्हणतात.