10 cities with the most traffic in the world, including four in India cities
जगात सर्वात बेक्कार ट्रॅफिकवाली 10 शहरं, भारतातल्या चार शहरांचा समावेश By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 11:02 PM2020-02-04T23:02:17+5:302020-02-04T23:05:43+5:30Join usJoin usNext ट्रॅफिकमधून गाडी चालवण्यासारखा कंटाळवाणा प्रकार नाही. अनेकदा ट्रॅफिकमध्ये अडकून पडल्यानं इच्छितस्थळी पोहोचण्यास विलंब होतो. गाडीत बसल्या बसल्या काय करावं तेच सुचत नाही. गाडीत बसल्या बसल्या काय करावं तेच सुचत नाही. विशेष म्हणजे जगभरात अशी अनेक शहरं आहेत, जिकडे ट्रॅफिकची समस्या आहे. वाहतूक कोंडीच्या यादीत दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू सारख्या शहरांचाही समावेश आहे. या यादीत 6 महाद्विपांमधल्या 57 देशांपैकी 416 शहरांचा समावेश आहे. In-Vehicle Navigation Company, TomTom यांनी वार्षिक ट्रॅफिक इंडेक्स जारी केला आहे. TomTomच्या आकड्यांनुसार भारतात सर्वाधिक ट्रॅफिक आहे. 10 मोठ्या वाहतुकीची कोंडी असणाऱ्या शहरांमध्ये भारतातल्या बंगळुरु, दिल्ली, मुंबई आणि पुण्याचा समावेश आहे. बंगळुरूनंतर 71 टक्के ट्रॅफिकसह फिलिपिन्सच्या मनिलाचा नंबर लागतो. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर भारतातली मुंबई आणि पुणे ही शहरं आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर बोगोटा हे शहर आहे. भारताची राजधानी असलेलं दिल्ली हे आठव्या स्थानी आहे. तर मास्को (रशिया), लीमा (पेरू), इस्तांबुल (तुर्की) आणि जकार्ता (इंडोनेशिया) क्रमशः 6व्या, 7व्या, 9व्या आणि 10व्या स्थानावर आहेत.