'हास्यसम्राट' चार्ली चॅप्लिनचे १० प्रेरणादायी विचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2018 17:07 IST2018-04-16T17:02:21+5:302018-04-16T17:07:10+5:30

विनोदी ढंगाच्या मूकाभिनयासाठी विशेष ख्याती असलेले जगातील सर्वात लोकप्रिय कलाकार म्हणजे चार्ली चॅप्लिन. चार्ली चॅप्लिनचा जन्म १६ एप्रिल १८८९ रोजी इंग्लंडच्या इस्ट स्ट्रीट, लंडन इथे झाला. आज त्यांची १२९ वी जयंती आहे. आपल्या आयुष्यात अनेक दु:खाचा सामना करूनही त्यांनी नेहमी लोकांना हसवलं. आपले विचार इतरांना सांगून चार्ली यांनी प्रत्येकाच्या मनावर राज्य केलं. अशा ह्या महान व्यक्तिमत्वाचे काही महान विचार खालीलप्रमाणे....
१) ज्या दिवशी तुम्ही आनंदी नसता तो दिवस व्यर्थ असतो.
२) माणसाचं व्यक्तिमत्व तेव्हाच समोर येतं, जेव्हा तो नशेत असतो.
३) आयुष्य जवळून पाहिलं तर शोकांतिका आहे आणि दुरून पाहिलं तर हास्यविनोद.
४) जगात काहीही कायमस्वरूपी नाही, आपली संकटंही नाही.
५) मला पावसात भिजायला आवडतं, कारण तेव्हा माझे अश्रू दिसत नाहीत.
६) हास्य हे दु:ख थांबवणारं टॉनिक आहे.
७) आयुष्य खूप सुंदर होईल, जेव्हा लोक तुम्हाला तुमचं आयुष्य जगू देतील.
८) मनापासून हसण्यासाठी तुम्हाला तुमच्या दु:खासोबत खेळणं गरजेचं आहे.
९) योग्य वेळी अयोग्य काम करणं यापेक्षा आयुष्यात दुसरी कोणतीही उपरोधिक गोष्ट नाही
१०) निर्दयी जगात राहण्यासाठी तुम्हालाही कधीतरी निर्दयी होण्याची गरज असते.