बुद्धीबळाच्या या मोहऱ्याला 55 वर्षांपूर्वी 415 रुपयांना खरेदी केले होते; आता 6 कोटींना लिलाव By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 03:48 PM 2019-07-04T15:48:12+5:30 2019-07-04T15:51:19+5:30
लंडनमध्ये 2 जुलैला 12 व्या शतकातील बुद्धीबळाच्या मोहऱ्याचा लिलाव झाला. 55 वर्षांपूर्वी या मोहऱ्याला 6 डॉलर म्हणजेच 415 रुपयांमध्ये खरेदी केले होते. मात्र, नुकत्याच झालेल्या लिलावामध्ये या मोहऱ्याला 6 कोटी रुपये मोजले आहेत
हा मोहरा स्कॉटलंडच्या एका व्यक्तीने 1965 मध्ये घेतला होता. त्याच्या कुटुंबियांना गेल्या महिन्यातच हा मोहरा कपाटात मिळाला होता.
आर्ट डीलर कंपनी सोदबीद्वारे या लिलावाचे आयोजन करण्यात आले होते. हा मोहरा घेणाऱ्याचे नाव उघड झालेले नाही.
हा मोहरा गेल्या 55 वर्षांपासून कपाटातच ठेवलेला होता. आजोबांच्या मृत्यूनंतर आजीने हा मोहरा संपत्ती म्हणून कुटुंबियांच्या ताब्यात दिला होता. हा 12 व्या शतकातील मोहरा आहे, असे या कुटुंबातील सदस्याने सांगितले.
हा मोहरा 3.5 इंच उंचीचा आहे. दाढी असलेल्या या मोहऱ्यावर उजव्या हातात तलवारसारखे हत्यार आहे आणि डाव्या हातात ढाल आहे. या लिलावात या मोहऱ्याला 7 कोटी येण्याची अपेक्षा कुटुंबाला होती.
जानकारांनुसार हा मोहरा त्या 93 मोहऱ्यांपैकीच आहे, जे 1831 मध्ये मिळाले होते. हे मोहरे 12 किंवा 13 व्या शतकात बनविण्यात आल्याचा अंदाज आहे. हे सर्व मोहरे वॉलरसच्या दातापासून बनविण्यात आले आहेत.
लंडनच्या ब्रिटीश म्युझियममध्ये 82 आणि स्कॉटलंडच्या नॅशनल म्युझियममध्ये 11 मोहरे ठेवण्यात आले आहेत. हे मोहरे नॉर्वेमध्ये मिळाले होते. यातील पाच मोहरे अद्याप गायब आहेत.