१९०० डिग्री तापमान, सात मिनिटे संपर्क तुटला, काळजाचा ठोका चुकला! कल्पना चावलाची आठवण झाली होती...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 10:44 IST2025-03-19T10:38:38+5:302025-03-19T10:44:06+5:30
NASA astronaut Sunita Williams returns to Earth: अंतराळ स्थानकावर अडकलेल्या अंतराळवीरांना परत आणण्यासाठी नासाने अनेक प्रयत्न केले परंतू त्या सर्वांना अपयश आले होते. तिथे यान नादुरुस्त होणे ते अनेकदा पृथ्वीवरून यान पाठविण्याच्या योजना फसल्या होत्या. अगदी स्पेसएक्सचे काल गेलेल्या यानाचे उड्डाणही आदल्या दिवशी टाळ्यात आले होते.

एक व्यावसायिक प्रयोग म्हणून आठ दिवसांसाठी आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनला गेलेले अंतराळवीर ते गेलेल्या यानात तांत्रिक अडचण आल्याने ९ महिन्यांपासून अंतराळातच अडकले होते. भारतीय वंशाची सुनिता विल्यम्स व तिचा सहकारी अंतराळवीर आज पृथ्वीवर परतले आहेत.
त्यांना घेऊन येणार कॅप्सुल फ्लोरिडाच्या समुद्रात लँड झाली आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. परंतू, सात मिनिटे अशी गेली की नासासह सर्वांना कल्पना चावलाच्या अपघाताची आठवण झाली. भारतीयांच्याच नाहीतर जगाच्या आयुष्यात तो क्षण पुन्हा आला होता, पण तो धोका पार करून कॅप्सुल पृथ्वीच्या कक्षेत आली.
बुधवारी पहाटे स्पेसएक्सचे ड्रॅगन कॅप्सुल सुनितासह चार अंतराळवीरांना घेऊन यशस्वीरित्या परतले. हजारो किंमींचा प्रवास १७ तासात पार करण्यात आला. परंतू, पृथ्वीच्या कक्षेत शिरताना ७ मिनिटे अशी आली की सर्वांनी श्वास रोखले होते. कारण प्रचंड वेग असलेल्या कॅप्सुलचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता.
अंतराळ स्थानकावर अडकलेल्या अंतराळवीरांना परत आणण्यासाठी नासाने अनेक प्रयत्न केले परंतू त्या सर्वांना अपयश आले होते. तिथे यान नादुरुस्त होणे ते अनेकदा पृथ्वीवरून यान पाठविण्याच्या योजना फसल्या होत्या. अगदी स्पेसएक्सचे काल गेलेल्या यानाचे उड्डाणही आदल्या दिवशी टाळ्यात आले होते. यान नेण्याऱ्या रॉकेटमध्ये बिघाड झाला होता. म्हणून गुरुवारी केले जाणारे उड्डाण रद्द करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी हे रॉकेट सोडण्यात आले होते.
एवढी संकटे पार करून नासा व स्पेसएक्सच्या शास्त्रज्ञांनी ही मोहिम यशस्वी केली खरी परंतू, अंतराळयान पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतानाचा टप्पा अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवून गेला होता. कल्पना चावला, 22 वर्षांपूर्वी झालेली दुर्घटना, आज भारतीयांच्या मनावर कोरलेली ही दुख:द जखम पुन्हा त्या घटनेची आठवण करून देत होती. पृथ्वीवर प्रवेश करतानाचा आव्हानात्मक टप्पा कल्पना चावलाच्या कॅप्सुलला पेलवला नव्हता. यात तिचा मृत्यू झाला होता.
सुनिता विल्यम्स येत असलेली कॅप्सुल पृथ्वीच्या बाह्या वातावरणावर धडकली, घर्षणामुळे ही कॅप्सुल एवढी तापली की क्षणात तापमान १९०० डिग्रीवर गेले आणि सात मिनिटांसाठी नासाचा कॅप्सुलशी संपर्क तुटला.
पहाटेची ३.२० ची वेळ होती. ३.१३ ला संपर्क तुटला, यान कुठे आहे ते कळत नव्हते. नासाचे शास्त्रज्ञ सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. ३.२० ला पुन्हा संपर्क झाला आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
२२ वर्षांपूर्वी काय घडले होते...
हे सात मिनिट म्हणजे ब्लॅक आऊट समजले जाते. ते खूप निर्णायक असतात. पृथ्वीच्या आवरणात प्रवेश करताना बाहेरील ऑब्जेक्टला खूप संघर्ष करावा लागतो. यावेळी तापमान वाढल्याने क्रॅश होण्याची शक्यता जास्त असते. आजपासून बरोबर २२ वर्षांपूर्वी फेब्रुवारी २००३ मध्ये भारताने लेक गमावली होती. नासाचे कोलंबिया हे यान अंतराळातून पृथ्वीवर परतत होते. त्यातून कल्पना चावला पृथ्वीवर परतत होती. पृथ्वीच्या वायुमंडळात जेव्हा तिचे यान आले तेव्हा ते हे तापमान पेलू शकले नाही आणि क्रॅश झाले.
कसा निर्माण होतो धोका...
अंतराळयान पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करत असताना त्याचा वेग हा अंदाजे २८००० किमी प्रति तास एवढा प्रचंड असतो. कॅप्सूल एवढ्या वेगाने खाली येते तेव्हा त्याचे घर्षण होते व तापमान वाढते. तसेच अनियंत्रितही होते. या काळात कंट्रोल रुमसोबत संपर्कही तुटतो. हा आघात सहन केला तरच ते यान सुखरूप खाली उतरते.