In 2019 Google searched for these things from around the world
2019 मध्ये गुगलवर जगभरातून या गोष्टींचा घेण्यात आला शोध By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 03:55 PM2020-01-04T15:55:08+5:302020-01-04T16:10:36+5:30Join usJoin usNext 2019 हे वर्ष सरून नुकतीच 2020 या नव्या वर्षाला सुरुवात झाली आहे. दरम्यान सरलेल्या वर्षात जगरातील लोकांनी सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगलवरून विविध गोष्टींचा शोध घेतला आहे. त्यामध्ये क्रिकेट सामन्यांचाही समावेश आहे. जाणून घेऊयात 2019 मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च झालेल्या गोष्टींविषयी. आयसीसी क्रिकेट विश्वचषक इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेबाबत जगभरातून गुगलवर मोठ्या प्रमाणात सर्च करण्यात आले. नोत्रे दाम आगीत भस्मसात झालेल्या पॅरिसमधील नोट्रे दाम या प्राचीन चर्चबाबतही गुगलवर मोठ्या प्रमाणात माहिती शोधली गेली. जोकर जोकर या हॉलीवूडमधील सुपरहीट चित्रपटाबाबतही मोठ्या प्रमाणात सर्च केले गेले. अॅ्व्हेंजर्स एंडगेम अॅ्व्हेंजर्स एंडगेम या चित्रपटानेही गुगल सर्चमध्ये मुसंडी मारली आहे. गेम ऑफ थ्रोन्स गेम ऑफ थ्रोन्स या चित्रपटाबाबतही गुगलवर मोठ्या प्रमाणावर सर्च केले गेले. आयफोन 11 आयफोन 11 बाबतही गुगलवरून मोठ्या प्रमाणावर माहिती मिळवली गेली. भारत वि बांगलादेश भारत वि बांगलादेश यांच्यातील क्रिकेट मालिकेबाबतही गुगलवर मोठ्या प्रमाणात सर्च झाले. कोपा अमेरिका कप 2019 कोपा अमेरिका कप 2019 बाबतही जगभरातून मोठ्या प्रमाणात सर्च केले गेले. कैमरन बॉयस कैमरन बॉयस याच्याबाबतही बऱ्यापैकी सर्च केले गेले. भारत वि. दक्षिण आफ्रिका भारत वि. दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेबाबत यंदाच्या वर्षी गुगलवर सर्वाधिक सर्च केले गेले टॅग्स :गुगलआंतरराष्ट्रीयभारतgoogleInternationalIndia