26 countries are now coronavirus free zero active corona cases
दिलासादायक! कोरोना होतोय हद्दपार; 'या' 26 देशांमध्ये आता एकही रुग्ण नाही By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 11:00 PM2020-06-09T23:00:14+5:302020-06-09T23:23:03+5:30Join usJoin usNext जगभरात आतापर्यंत 72 लाखहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 4 लाखहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र या सर्व परिस्थितीत दिलासादायक गोष्ट म्हणजे, आता अनेक देशांतून कोरोना व्हायरस हद्दपार होऊ लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून तर अनेक देशांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण समोर आलेला नाही. जगभरात आतापर्यंत 35.53 लाखहून अधिक लोक कोरोनातून बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. एवढेच नाही, तर जगात 26 देश असे आहेत. जेथे कोरोनाचा एकही रुग्ण नाही. वर्ल्डओमीटर वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, सध्या जगात 32.54 लाखहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी 32.01 लाख केसेस माइल्ड स्वरुपाच्या आहेत. तर 53,800हून अधिक गंभीर आहेत. आता जाणून घेऊयात अशा देशां विषयी, जेथे कोरोनाचा एकही रुग्ण नाही. न्यूझीलंड, आयले ऑफ मॅन, माँटेनेग्रो, फेरो आयलँड, त्रिनिदाद अँड टोबॅगो, अरूबा, फ्रेन्च पॉलिनेशिआ, मकाओ, अॅरित्री, तिमोर-लेस्टे, न्यू कॅलेडोनिआ, लाओस, फिजी, सेन्ट किट्स अँड नेव्हिस, फाल्कलँड आइलँड्स, ग्रीनलँड, टर्क्स अँड कायकोज, व्हॅटिकन सिटी, मॉन्टसेराट, सेशेल्स, ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स, पापुआ न्यू गिनी, कॅरिबियन नेदरलँड्स, सेन्ट बार्थ, अंग्विला आणि सेन्ट पियरे मिक्वेलॉन. हे ते देश आहेत, जेथे कोरोनाचा एकही रुग्ण नाही. वर्ल्डओमीटर वेबसाइटनुसार, जगभरातील सर्व देश आणि ठिकानांपैकी या 26 देशांमध्ये आता एकही कोरोना संक्रमित व्यक्ती नाही. न्यूझीलंडमध्ये 1504 रुग्ण होते. यापैकी 22 जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर बरे झाले आहेत. फेरो आयलँडमध्ये 187 लोकांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र ते सर्व स्वस्थ झाले आहेत. येथे एकाचाही मृत्यू झाला नाही. या 26पैकी 18 देश असे आहेत, जेथे लोकांना कोरोना झाला. मात्र, त्यापैकी एकाचाही मृत्यू झाला नाही. या देशांत- फेरो आयलँड, फ्रेन्च पॉलिनेशिआ, मकाओ, एरित्री, तिमोर-लेस्टे, न्यू कॅलेडोनिआ, लाओस, फिजी, सेन्ट किट्स अँड नेव्हिस, फॉल्कलँड आयलँड्स, ग्रीनलँड, व्हॅटिकन सिटी, सेशेल्स, पापुआ न्यू गिनी, कॅरिबियन नेदरलँड्स, सेन्ट बार्थ, अंग्विला आणि सेन्ट पियरे मिक्वेलॉन, या देशांचा समावेश आहे. या देशां शिवाय, पाच देश असेही आहेत, जेथे केवळ एकच अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तर काही देशांत असे आहेत, जेथे 10 पेक्षा कमी अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. हे देशही लवकरच स्वतःला कोरोनामुक्त देश म्हणून घोषित करू शकतात. एक अॅक्टिव्ह केस असलेल्या देशांत - ब्रुनेई, सिन्ट मारटेन, ग्रेनाडा, बेलीज आणि सेन्ट लुसिआ, या देशांचा समावेश होतो. एकहून अधिक, मात्र 10 पेक्षा कमी अॅक्टिव्ह रुग्ण असलेल्या देशांत - लिसोथो, पश्चिमी सहारा, डॉमिनिका, मोनॅको, अँटीगुआ अँड बारबुडा, कंबोडिया, मॉरिशस, आइसलँड, बारबाडोस, कुराकाओ, सेन्ट मार्टिन, गांबिया, गुआडेलूप, तैवान आणि शनेल आयलँड्सचा समावेश होतो. (सर्व फोटो अशा देशांचे आहेत, जेथे कोरोनाचा आता एकही रुग्ण नाही.)Read in Englishटॅग्स :कोरोना वायरस बातम्याकोरोना सकारात्मक बातम्यान्यूझीलंडcorona virusCoronaVirus Positive NewsNew Zealand