अभिनेत्री प्रियंका चोप्रानं बांगलादेशातील रोहिंग्यांच्या छावणीला दिली भेट By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2018 04:20 PM 2018-05-23T16:20:19+5:30 2018-05-23T16:20:41+5:30
अभिनेत्री प्रियंका चोप्रानं बांगलादेशातील सर्वात मोठ्या छावणीला भेट दिली आहे.
या छावणीतील बहुसंख्य महिलांवर गेल्या वर्षीच्या अत्याचारांच्या मालिकेत बलात्कार झाले आहेत.
ऑगस्ट 2017 पासून 7 लाखांहून अधिक रोहिंग्यांनी म्यानमार सोडून बांगलादेशच्या दिशेने पलायन केले होते. यांमध्ये 81 हजार महिला गरोदर होत्या असे बांगलादेशाच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
संयुक्त राष्ट्राच्या अंदाजानुसार गरोदर महिला व मुलींची संख्या 40 हजारांच्या आसपास आहे.
संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार बांगलादेशातील रोहिंग्यांच्या छावण्यांमध्ये दररोज 60 बालकांचा जन्म होत आहे.
या वर्षभरामध्ये 16 हजार बालकांचा जन्म झाला असून मे आणि जून अखेरपर्यंत आणखी 25 हजार बालकांचा जन्म होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या बालकांची अभिनेत्री प्रियंका चोप्रानं भेट घेतली आहे.