Adrian Hill says oxford university coronavirus vaccine trial 50 percent success chance sna
CoronaVirus News: संपूर्ण जग वाट बघतय; पण, ऑक्सफर्डच्या वैज्ञानिकानेच अर्धी करून टाकली व्हॅक्सीनची आशा By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 07:23 PM2020-05-24T19:23:53+5:302020-05-24T19:48:22+5:30Join usJoin usNext डब्ल्यूएचओ आणि भारतासह अनेक देश ज्या व्हॅक्सीनची अक्षरशः डोळेलावून वाट बघत आहे. अनेक ठिकाणी ज्या व्हॅक्सीनच्या उत्पादनाचे कामही सुरू झाले आहे, आता त्याच व्हॅक्सीनशी संबंधित एका वैज्ञानिकाने सर्वांचीच आशा अर्धी करून टाकली आहे. ब्रिटिश वृत्तपत्र टेलिग्राफमध्ये छापून आलेल्या एका वृत्तानुसार, ऑक्सफर्डच्या कोरोना व्हॅक्सीन डेव्हलपमेन्ट टीमचे नेतृत्व करणाऱ्या वैज्ञानिकांपैकी एक अॅड्रिअन हिल यांनी म्हटले आहे, की या व्हॅक्सीनची ट्रायल यशस्वी होण्याची आशा केवळ 50 टक्के एवढीच आहे. अॅड्रिअन हिल हे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या जेनर इंस्टीट्यूटचे संचालक आहेत. ते म्हणाले, पुढील ट्रायलमध्ये 10 हजार व्हॉलंटिअर्सना सहभागी करण्यात येत आहे. मात्र, असेही होऊ शकते, की याचा काहीही निकाल येणार नाही. कारण इंग्लंडमध्ये नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वेगाने घट होत आहे आणि संक्रमण दरही कमी होत आहे. अॅड्रिअन हिल म्हणाले, हे गायब होत चाललेल्या व्हायरस आणि वेळेसोबत पळण्यासारखे आहे. सध्या तरी, 50 टक्के असे वाटते, की आमच्या हाती काहीही परिणाम लागणार नाही. ऑक्सफर्ड यूनिवर्सिटी ChAdOx1 nCoV-19 नावाच्या व्हॅक्सीनवर काम करत आहे. जग भरात असेच गृहित धरले जात आहे, की ही व्हॅक्सीन इतर व्हॅक्सीनच्या तुलनेत अधिक यशस्वी होत आहे. अॅड्रिअन हिल यांच्या चमूने एप्रिल महिन्यात मानवावर याचे परिक्षण करायला सुरुवात केली होती. जगभरात एवढ्या लवकर मानवारवर परिक्षण सुरू केलेल्या फार कमी व्हॅक्सीन आहेत. याच आठवड्यात AstraZeneca नावाच्या औषध कंपनीने ऑक्सफर्डच्या व्हॅक्सीनचे 40 कोटी डोस तयार करण्यासाठी अमेरिकेसोबत 1.2 बिलियन डॉलरचा करारही केला आहे. इंग्लंड सरकार या व्हॅक्सीनच्या 10 कोटी डोसची किंमत देण्यासाठीही तयार झाले आहे. इंग्लंमधील लोकांना आशा आहे, की सप्टेंबरपर्यंत त्यांच्यासाठी 3 कोटी व्हॅक्सीनचे डोस तयार होतील.Read in Englishटॅग्स :कोरोना वायरस बातम्याइंग्लंडअमेरिकाविज्ञानडॉक्टरcorona virusEnglandAmericasciencedoctor