Afghanistan: RAF pilot Kev Latchman explains how he lifted a packed plane over a bus to escape Kabul
Kabul Airport Blast: दहशतवाद्यांनी रोखलं तरीही घेतलं विमानाचं उड्डाण, वाचले अनेक प्राण; वाचा पायलटचा थरार By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 05:30 PM2021-09-05T17:30:19+5:302021-09-05T17:35:52+5:30Join usJoin usNext १५ ऑगस्टला काबुलवर तालिबानने कब्जा केल्यानंतर अफगाणिस्तानातील लोक जीव मुठीत घालत विमानतळाच्या दिशेने पळाले. त्याचा परिणाम असा झाला की, रनवेवर मोठ्या संख्येने अफगाणी नागरिकांची गर्दी झाली. अफगाणी लोकं काहीही करून देश पलायन करण्याच्या मानसिकेतच होते. यासाठी काही जण विमानाच्या चाकांवरही लटकल्याचं दृश्य पाहायला मिळालं. आता एका पायलटनं त्या परिस्थितीत रनवे वरुन टेकऑफ करणंही किती धोकादायक झालं होतं. जराशी चूकही हजारो लोकांच्या मृत्यूचं कारण बनलं असं याबाबत अनुभव सांगितला आहे. ब्रिटीश वायूसेनेचे विंग कमांडर आणि पायलट कॅव लॅचमॅनने सांगितले की, २६ ऑगस्टला विमानतळावर झालेल्या भीषण स्फोटानंतर काबुल सोडणाऱ्या लोकांसह विमान टेक ऑफ करण्याचा प्रयत्न करत होतो. तेव्हा अचानक रनवेवर तीन गाड्या आल्या. आम्ही सुदैवाने वाचलो आणि लोकांना कुठलंही नुकसान झालं नाही. गाडी वेगाने आमच्या दिशेने येत होते परंतु लोकांचा जीव वाचवण्यासाठी आम्ही उड्डाणावेळी पर्याप्त स्पीड नसतानाही टेक ऑफ करण्याचा निर्णय घेतला. विंग कमांडर लॅचमॅन आणि त्यांच्या सहचालकाने सांगितले की, ज्या ट्रान्सपोर्ट जेटमध्ये लोक प्रवास करत होते. त्याचे वजन २६५ किलो होतं. आम्ही या वजनासह टेक ऑफ करण्याचा निर्णय घेतला. आम्ही विमान घेऊन रनवेवर एकाबाजूने पुढे जात होतो आणि दुसऱ्या बाजूने रनवेवर गाड्यांचा ताफा येत होता. स्काई न्यूजला दिलेल्या मुलाखतीत कमांडर लॅचमॅन म्हणाले की, जर आम्ही टेकऑफ थांबवलं असतं तर सर्वांचा जीव धोक्यात आला असता हे आम्हाला जाणवलं. त्यामुळे मी पुढे काय होईल याचा विचार बंद करत टेकऑफ करण्याचा निर्णय घेतला. संभाव्य धोक्याआधी काही सेकंदापूर्वी, विंग कमांडर लॅचमॅननं त्याच्या सहपायलटसोबत चर्चा केली. सामान्य ते धीम्या गतीने उड्डाण भरण्याचा प्रयत्न करण्यावर आमचा संवाद झाला. कारण त्याठिकाणी थांबणं कुठल्याही परिस्थितीत सुरक्षित नव्हतं. आपल्याला लवकरात लवकर टेकऑफ घ्यायला हवं असं सहपायलटनंही मान्य केले. आम्ही रोटेट स्पीडहून जवळपास २० नॉट आधीच एअरक्राफ्ट उड्डाण घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही काही सेकंदात हवेत उडलो. ज्यावेळी विमान रनवेवरुन हवेत पोहचलं तेव्हा त्या गाड्यांचा ताफा आणि विमानात केवळ १० फूट अंतरच वाचलं होतं. पायलटनं टेक ऑफवेळी आलेल्या समस्यांबाबत सांगितले की, स्फोटानंतर एअरपोर्टवरील वीज पुरवठा खंडीत झाला. ज्यामुळे रनवेवर लाइटनं काम करणं बंद केले. सैन्य हवाई नियंत्रण कक्षातून लॅचमॅनला उपलब्ध जागेत उड्डाण घेऊ शकणार नाही असं सांगितलं. परंतु वायूसेनेच्या पायलटनं ते करून दाखवलं. काबुल एअरपोर्टच्या गेटवर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात कमीत कमी १६९ अफगाणी नागरिक, १३ अमेरिकन सैनिक, २ ब्रिटीश नागरिकांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांकडून निर्माण झालेल्या संकटात ब्रिटीश वायूसेनेनं १५ हजाराहून अधिक लोकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यात यश मिळवलं. टॅग्स :काबूल बॉम्बस्फोटअफगाणिस्तानतालिबानKabul Bomb BlastAfghanistanTaliban