Afghanistan Taliban Crisis: अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर तालिबानची भारताला खुली ऑफर; पंतप्रधान करणार स्वीकार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 12:20 PM2021-08-17T12:20:57+5:302021-08-17T12:28:57+5:30

Afghanistan Taliban Crisis: रविवारी तालिबानने अफगाणिस्तानातील काबुलवर कब्जा मिळवला आहे.

अफगाणिस्तानच्या बिघडलेल्या परिस्थितीकडे पाहून अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत चर्चा केली आहे. एंटनी ब्लिंकनने अफगाणिस्तान हिताच्या बाजूने असणाऱ्या प्रत्येक देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद साधला आहे. ब्रिटन, रशिया, चीनसह भारताचा त्यात समावेश आहे. या देशांनी अफगाणिस्तानाच्या विकासावर प्रचंड खर्च केला आहे, अद्यापही अनेक योजना याठिकाणी पूर्ण केल्या जाणार आहेत.

अफगाणिस्तानच्या बिघडलेल्या परिस्थितीकडे पाहून अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत चर्चा केली आहे. एंटनी ब्लिंकनने अफगाणिस्तान हिताच्या बाजूने असणाऱ्या प्रत्येक देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद साधला आहे. ब्रिटन, रशिया, चीनसह भारताचा त्यात समावेश आहे. या देशांनी अफगाणिस्तानाच्या विकासावर प्रचंड खर्च केला आहे, अद्यापही अनेक योजना याठिकाणी पूर्ण केल्या जाणार आहेत.

पाकिस्तानच्या एका चॅनेलशी बोलताना तालिबानी नेत्याने अफगाणिस्तानच्या जमिनीचा वापर दुसऱ्या देशांविरोधात करणार नाही असं आश्वासन दिले आहे. भारताने त्यांच्या योजना पूर्ण करायल्या हव्यात. तालिबानी प्रवक्ता सुहैल शाहीनने सांगितले की, कुठल्याही देशाविरोधात अफगाणिस्तानची जमिन वापरू देणार नाही.

भारताने अफगाणिस्तानात त्यांच्या अर्धवट राहिलेले प्रकल्प पूर्ण करावेत असं तालिबानने सांगितले आहे. भारताने अफगाणिस्तानात बरीच गुंतवणूक केली आहे. परंतु त्यांनी तालिबानी सत्तेला मान्यता दिली नाही. परंतु आता परिस्थिती बदलली आहे असा प्रश्न तालिबानला विचारला होता.

त्यावर आम्ही यापूर्वीच सांगितले आहे कुठल्याही देशाविरुद्ध आमच्या अफगाणिस्तानचा वापर केला जाणार नाही हे स्पष्ट आहे. दुसरं. जर भारताने अफगाणिस्तानात विकासाचे प्रकल्प बनवत असेल, निर्माण करत असेल तर त्यांनी ते करावे कारण ते जनतेसाठी आहेत.

तालिबानचे प्रवक्ते सुहैल शाहीन म्हणाले की, परंतु कुणीही अफगाणिस्तानची जमीन स्वत:च्या फायद्यासाठी, त्यांच्या देशाच्या स्वार्थासाठी वापरत असेल तर आम्ही त्याला परवानगी देणार नाही असंही तालिबाने म्हटलं आहे.

अफगाणिस्तानात भारताचे खूप अशी माणसं आहे जी पाकिस्तानविरोधात काम करतात, परंतु अफगाणची जमीन कुठल्याही देशाविरोधात वापर करण्यास देणार नाही असं तुम्ही म्हटलंय. मग आता तुम्ही भारतासोबत चांगले संबंध ठेवण्यास इच्छुक आहात का? असा प्रश्न पत्रकाराने तालिबानला विचारला.

त्यावर तालिबानने पुन्हा स्पष्टपणे सांगितले की, जर भारत अफगाणिस्तानात धरण आणि रस्ते यासारख्या योजना बांधत असेल, त्या आता पूर्ण झाल्या नाहीत तर भारताने त्या पूर्ण कराव्यात. परंतु दुसऱ्या देशाविरोधात अफगाणिस्तानच्या जमिनीचा वापर करण्याची आम्ही परवानगी देणार नाही. ही आमची क्लिअर कट पॉलिसी आहे.

इंडिया टूडेला दिलेल्या मुलाखतीत तालिबानने म्हटलंय की, तालिबान भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरु असलेल्या संघर्षात भाग घेऊ इच्छित नाही. मागील ४० वर्षापासून आम्ही इथं जिहाद करतो. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढाईचा आम्ही भागीदारी बनणार नाही. आम्ही स्वातंत्र्यासाठी लढणारे लोक आहोत. आम्ही अफगाणिस्तानचे लोक आहोत.

दरम्यान, भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सोमवारी अमेरिकेच्या एंटनी ब्लिंकन यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. त्यानंतर जयशंकर यांनी लिहिलंय की, अफगाणिस्तानात घडत असलेल्या घटनांवर आमची चर्चा झाली. काबुल विमानतळावर पुन्हा सुरळीत विमान वाहतूक सुरु व्हावी यासाठी अमेरिकाही प्रयत्नशील आहे असं ते म्हणाले.

अमेरिकेचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस म्हणाले की, जयशंकर आणि पाकचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांच्याशी फोनवर चर्चा झाली. अफगाणिस्तान येथील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आणि रशियाचे सर्गेई लावरोव यांच्याशी सुरक्षा आणि परिस्थितीबाबत चर्चा केली.