Afghanistan: Taliban death squads ‘trawl porn sites to compile kill list of Afghan prostitutes
तालिबानींचा क्रूर चेहरा, ‘त्या’ महिलांचा शोध सुरु; सापडल्यास भरचौकात शिर छाटणार अन्... By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 09:54 PM2021-09-02T21:54:49+5:302021-09-02T21:58:14+5:30Join usJoin usNext अफगाणिस्तानवर पूर्णत: कब्जा केल्यानंतर आता तालिबान त्याठिकाणी सरकार बनवण्याच्या हालचाली करत आहेत. अफगाणिस्तानात महिलांची अवस्था पाहता वारंवार महिलांना अधिकार देऊ म्हणणाऱ्या तालिबानींचा खरा चेहरा सारखा समोर येत आहे. सत्ता मिळवल्यानंतर आता तालिबान एडल्ट वेबसाईट्सचा शोध घेत आहेत. त्यातून अफगाणी सेक्स वर्कर्सची यादी तयार करण्यात येत आहे. तालिबान अशा सेक्स वर्कस आणि रेड लाइट निवासाची यादी बनवत आहे जे मागील २० वर्षात याठिकाणी बनले. द सन ऑनलाइन रिपोर्टनुसार, अफगाणी वेश्या व्हिडीओचा शोध घेतला जात असून तालिबान अशा मुलींची यादी बनवणार आहे. द सननं सूत्राने बातमी दिलीय की, तालिबान आता या वेश्यांना सामुहिक शिक्षा देण्यासाठी किंवा स्वत:च्या आनंदासाठी शोधत आहे. या महिलांना नरकासारखं जीवन जगावं लागेल. सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे अशा महिलांना शिर कापणे, दगडं मारणे अथवा लटकावणे यासारखी तालिबानी शिक्षा दिली जाईल. तत्पूर्वी तालिबानी दहशतवाद्यांकडून त्यांच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात येईल. एडल्ट साइट्सवर सर्च मोहिम केल्यानंतर काही व्हिडीओत पाश्चिमी देशातील पुरुषांसोबत संबंध ठेवणाऱ्या महिलांना पाहून तालिबानचा संताप वाढला आहे. अफगाणिस्तानात तालिबानी सत्ता आल्यानंतर आता त्याठिकाणी महिलांना क्रूर शिक्षेचा सामना करावा लागू शकतो. तालिबानींमुळे कठोर नियम आणि बंधनात महिलांना जगण्यास भाग पाडलं जाईल. तालिबानी अश्लिल साहित्याची निंदा करण्याचा दिखावा केला जातो. परंतु अश्लील साईटवर सर्च मोहिम सुरू आहे. जेणेकरून अफगाणिस्तानात सुरु असलेल्या कुंटणखान्याबाबत माहिती मिळेल आणि त्या महिलांची ओळख पटवून त्यांना गुलाम बनवलं जाऊ शकतं. तालिबानने ९० च्या दशकात अफगाणिस्तानात सत्ता असताना महिलांवर वाईटरित्या अत्याचार केले होते. सार्वजनिकपणे निर्दयी हत्याकांड घडवलं होतं. लग्नाव्यतिरिक्त यौन संबंध ठेवणाऱ्या महिलांना शिकार बनवलं जातं. विरोध केल्यानंतर त्यांची खुलेआम हत्या केली जाते. अफगाणिस्तानात सेक्स वर्क बेकायदेशीर आहे. परंतु जसं जसं देशात व्यवसाय वाढू लागला तसं तसं सेक्ससाठी स्वत:ला विकणाऱ्या महिला आणि पुरुषांची संख्याही वाढू लागली. या पुरुष आणि महिलांना दुसरं कोणतंही काम राहिलं नाही अफगाणिस्तानात मानवाधिकार संघटनांनी जूनमध्ये इशारा दिला होता की, अफगाणिस्तानात सुरक्षा दलाच्या वापसीपूर्वी देशाची राजधानी काबुल येथे शेकडोच्या संख्येने वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला होत्या. हा वेश्याव्यवसाय घरांमध्ये, कॉफी शॉप आणि ब्यूटी पार्लरमध्ये सुरु होता. एका सेक्स वर्करनं सांगितलं की, माझ्या छोट्या भावाच्या आजारपणानंतर माझ्यावर ५ भाऊबहिणींची जबाबदारी आली. तेव्हा मी वेश्या व्यवसायाकडे वळाले. २० वर्षाची ही मुलगी दर आठवड्याला ३ पुरुषांची लैंगिक संबंध ठेवते. प्रत्येक ग्राहकाकडून तिला २००० अफगाणी चलन मिळतं. बहुतांश पुरुष ग्राहक हे युवा असायचे. ज्यांचे वय २५ ते ३० वयोगटातील आहे. यातील अधिक विवाहित होते. ते माझ्या एजेंटला ओळखायचे. त्याच्याद्वारे माझी आणि ग्राहकांची भेट व्हायची. अनेकदा पुरुष बऱ्याच महिलांमधून एकीची निवड करायचे. टॅग्स :अफगाणिस्तानतालिबानAfghanistanTaliban