सुंदर दिसण्याच्या नादात अशी झाली महिलेची अवस्था, फोटो पाहूनच येईल रडू... By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 04:42 PM 2021-10-27T16:42:52+5:30 2021-10-27T16:51:09+5:30
याला असंही समजून घेता येतं की, महिला कोमासारख्या स्थितीत आहे. कारण वेजिटेटिव स्टेट आणि कोमात केवळ इतकंच अंतर आहे की, वेजिटेटिव स्टेटमध्ये व्यक्ती शुद्धीवर राहतो. एका महिलेने सुंदर दिसण्यासाठी आपलं नाक ठीक करण्यासाठी आणि शरीराच्या काही भागातून चरबी कमी करण्यासाठी कॉस्मेटिक सर्जरी केली होती. आता ४ वर्षापासून तिची हालत अशी आहे की, ती हॉस्पिटलमध्ये बेडवर पडून आहे. मेडिकल सायन्सच्या भाषेत महिला वेजिटेटिव स्टेरटमध्ये आहे. म्हणजे तिच्या मेंदूने काम करणं बंद केलं आहे आणि ती बोलणं, ऐकणं आणि समजण्याच्या स्थितीत नाही.
याला असंही समजून घेता येतं की, महिला कोमासारख्या स्थितीत आहे. कारण वेजिटेटिव स्टेट आणि कोमात केवळ इतकंच अंतर आहे की, वेजिटेटिव स्टेटमध्ये व्यक्ती शुद्धीवर राहतो. वेजिटेटिव स्टेटच्या रूग्णाला हेही समजत नाही की, त्याच्या आजूबाजूला का होत आहे. तो केवळ जिवंत पण मृत शरीरासारखा असतो.
३२ वर्षीय सबीना अब्बास ४ वर्षापासून हॉस्पिटल भरती आहे. तिची ही अवस्था नोज जॉब आणि लायपोसक्शन केल्यानंतर झाली आहे. महिलेला सुंदर दिसायचं होतं आणि यासाठी तिने एका प्रायव्हेट क्लीनिकमध्ये दोन्ही प्रोसीजर केल्या होत्या.
२०१७ मध्ये एका डॉक्टरने तिचं लायपोसक्शन आणि रायनोप्लास्टी एकत्रच केली. यादरम्यान ४ मिनिटांसाठी तिचं हृदय बंद पडलं होतं. यानंतर क्लीनिकने तिला एका हॉस्पिलमध्ये शिफ्ट केलं होतं. लायपोसक्शन एक अशी सर्जरी आहे ज्यात शरीराच्या एखाद्या भागात जमा झालेली चरबी काढली जाते. तेच रायनोप्लास्टीमध्ये नाकाला हवा तसा आकार दिला जाऊ शकतो.
मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार, ऑपरेशन दरम्यान तुर्कीच्या अंताल्या प्रांतातील सबीन वेजिटेटिव स्टेटमध्ये गेली. तेव्हापासून तिला ना काही ऐकायला येत नाही समजू शकत ना काही बोलू शकत. सबीनाच्या पतीने तिच्या या अवस्थेसाठी क्लीनिकला जबाबदार ठरवलं आहे. त्याने क्लीनिकच्या प्लास्टिक सर्जन आणि एनेस्थेसियोलॉजिस्ट विरोधात तक्रार केली आहे.
सबीना २ मुलांची आहे आणि तिची ही अवस्था झाल्यापासून पती आणि मुलांचं आयुष्य फार अवघड झालं आहे. रूस्तम सांगतो की, '४ वर्षापासून आमचं जीवन नरक झालं आहे. माझे ६ आणि ४ वर्षाचे लेकरं आई घरी येण्याची वाट बघत आहेत. हॉस्पिटल पत्नीला डिस्चार्ज देण्यासाठी तयार आहे. पण मी तिला अशा स्थितीत घरी कसं नेऊ'.