Air hostesses face these challenges
एअर हॉस्टेसना करावा लागतो या आव्हानांचा सामना By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 03:45 PM2019-10-16T15:45:36+5:302019-10-16T15:56:09+5:30Join usJoin usNext एअर हॉस्टेसचे नाव घेताच आपल्यासमोर सुंदर, ग्लॅमरस आणि हजरजबाबी चेहऱ्याच्या तरुणी उभ्या राहतात. पण एअर हॉस्टेसचे काम वाटते तितके सोपे नाही. त्यांना आपल्या दैनंदिन कामात अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. एअर हॉस्टेसना आपले वजन नेहमी नियंत्रणात ठेवावे लागते. काही वर्षांपूर्वी वजन प्रमाणापेक्षा जास्त असल्याने एअर इंडियाने सुमारे 130 एअर हॉस्टेसना कामावरून कमी केले होते. एअर हॉस्टेससाठी फिटनेस खूप महत्त्वाचा असतो. फिट नसल्यास आपातकालीन परिस्थितीत त्यांना आपले काम व्यवस्तितपणे करता येऊ शकणार नाही. त्यामुळे प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. विमान पत्तन प्राधिकरण एअसर हॉस्टेससाठी बॉडी मास इंडेक्स आणि अन्य फिटनेसचे मानदंड तयार करत असतात. 2010 मध्ये एअर इंडियाने 10 फ्लाइट अटेंडन्टना फिटनेसचे कारण देऊन फ्लाइट ड्युटीवरून हटवले होते. स्वस्तात सेवा देणाऱ्या विमान कंपन्यांमध्ये अन्य सुविधा नसल्या तरी केबिन क्रू हा असतोच. त्यावरून त्यांचे महत्त्व समजून येते. लांब पल्ल्याच्या विमान सेवांमध्ये केबीन क्रूला खूप जास्त ड्युटी करावी लागते. कधी विमानात वैद्यकीय आणीबाणी निर्माण होते. त्यामुळे केबीन क्रू फिट असणे महत्वाचे असते. टॅग्स :विमानविमानतळairplaneAirport