Airplane: जगातील सर्वात मोठं विमान आकाशात उडालं, जाणून घ्या खासियत By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 03:39 PM 2022-01-18T15:39:35+5:30 2022-01-18T16:02:25+5:30
या विमानाने टेस्ट लिफ्टमध्ये 4 तास आणि 23 मिनिटे हवाई सफर करत पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली. यावेळी, उंच डोंगररांगाच्या उंचावरुनही टेहाळणी केली. तब्बल 23,500 च्या उंचीवरुन या विमानाने हवाई सफर केल्याचं विमान बनवणाऱ्या स्ट्रेटोलॉन्च कंपनीने सांगितले आहे. जगातील सर्वात मोठे विमान Roc ने पुन्हा एकदा आकाशात उंच झेप घेतली आहे. रविवारी तब्बल 8 महिन्यांनंतर प्रथमच या विमानाने आपली गगनभरारी घेतली.
या विमानाने टेस्ट लिफ्टमध्ये 4 तास आणि 23 मिनिटे हवाई सफर करत पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली. यावेळी, उंच डोंगररांगाच्या उंचावरुनही टेहाळणी केली. तब्बल 23,500 च्या उंचीवरुन या विमानाने हवाई सफर केल्याचं विमान बनवणाऱ्या स्ट्रेटोलॉन्च कंपनीने सांगितले आहे.
विमानाचे हे आत्तापर्यंतचे सर्वात चांगले उड्डाण होते. यापूर्वीच्या उड्डाणावेळी विमानाने 17000 फूट उंचीपर्यंत सफर केला होता. या विमानास 35 हजार उंच फूट उड्डाण करण्यासाठी डिझाईन केल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.
विमानाचे यशस्वी उड्डाण हे विमान उत्तमपणे काम करत असल्याची ग्वाही देत आहे, असे कंपनीच्या सीईओंनी म्हटले आहे. विमानात बोईंग 747 चे 6 इंजिन लागले आहेत, तसेच यामधून हवेतच हायपरसोनिक एअरक्राफ्ट लाँच करण्यात येऊ शकतात.
या विमानाच्या इतिहासातील हे तिसरे उड्डाण आहे, अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील विमानतळावरुन हे उड्डाण करण्यात आले आहे. विमानाच्या पंख्याची लांबी 117 मीटर एवढी आहे.
मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक पॉल एलन यांनी स्ट्रेटोलाँच कंपनीची 2011 मध्ये स्थापन केली आहे. हवेतूनच अवकाशात सॅटेलाईट लाँच सहजतेनं करण्यात यावं, या उद्देशाने हे विमान बनविण्यात आले आहे. सुनरसोनिक वाहनांना अवकाशात घेऊन जाण्यास हे विमान सक्षम आहे.
या विमानात 6 शक्तिशाली इंजिन लावण्यात आले असून त्याचे वजन 2,49,475.804 किलो एवढे आहे. त्यामुळेच हे विमान 35 हजार फुट उंचीवर जाऊ शकते. यह एक कॉन्सेप्ट एयरक्राफ्ट असून मोठ्या उंचीवरुन रॉकेट लॉन्च करू शकेल.
त्यामध्ये, भविष्यात परंपरागत पद्धतीने सॅटलाइट लॉन्च करण्याचा पर्याय मिळू शकतो. पॉल एलन यांचा 2018 साली मृत्यू झाल्यानंतर ही कंपनी विकण्यात आली आहे.
कंपनीचे नवे मालक या विमानातून हायपरसोनिक रॉकेट को लॉन्च करू इच्छित आहेत, ज्याचा स्पीड ध्वनीपेक्षाही 5 पट अधिक असणार आहे.