Alaska surveys damage from major earthquakes
अलास्का भूकंपाच्या धक्क्याने हादरले! By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2018 06:20 PM2018-12-01T18:20:42+5:302018-12-01T18:45:17+5:30Join usJoin usNext अलास्काच्या दक्षिणेकडे असणाऱ्या केनाई उपद्वीपला 7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा तीव्र धक्का बसला आहे. भूकंपांमुळे अलास्कातील अनेक रस्ते खचले आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अलास्का भूकंपाने हादरले असून मोठ्याप्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. 7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा फटका परिसरातील जवळपास 10 हजाराहून अधिक नागरिकांना बसला आहे. भूकंपामुळे परिसरातील इमारती, पूल कोसळले आहेत. तसेच रस्त्यांनाही मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. भूकंपाचं केंद्र एंकोरेज या शहराच्या उत्तरेला 7 मैलावर होतं. भूकंपामुळे 40 वेळा कंपनं जाणवली. भूकंपानंतर परिसरातील वीजपुरवठा हा खंडीत करण्यात आला. एंकोरेज आणि परिसरातील क्षेत्रात सुमारे 4 लाख नागरिक वास्तव्य करत असल्याची माहिती मिळाली आहे. भूकंपानंतर 'नॅशनल ओशियनिक अॅण्ड अॅटमोस्फियरिक एडमिनिस्ट्रेशन' यांच्याकडून त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता. मात्र, उत्तर अमेरिकेतील कॅनेडियन क्षेत्राचं मूल्यांकन केल्यानंतर त्सुनामीचा इशारा मागे घेण्यात आला. टॅग्स :भूकंपEarthquake