अमेरिका तोंडावर आपटली! कोरोना व्हायरस पहिल्यांदा अमेरिकेतच; यूएस सीडीसीचा रिपोर्ट By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2020 10:41 AM 2020-12-02T10:41:40+5:30 2020-12-02T10:45:00+5:30
Corona Virus News: चीनच्याच वुहान शहरातून हा व्हायरस जगभर पसरल्याचे म्हटले जात आहे. मात्र, अमेरिकेच्याच एका सरकारी संस्थेने हा दावा खोडून काढला आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) च्या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. कोरोना व्हायरसच्या उगमाला वर्ष झाले आहे. गेले वर्षभर अमेरिकेसह सारे जग कोरोना व्हायरसचा जन्म हा चिन्यांचीच देण असल्याचा आरोप करत होते. चीनच्याच वुहान शहरातून हा व्हायरस जगभर पसरल्याचे म्हटले जात आहे.
मात्र, अमेरिकेच्याच एका सरकारी संस्थेने हा दावा खोडून काढला आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) च्या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे.
सीडीसीच्या या अहवालानुसार सरकारी पाहणीत अमेरिकेत गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच कोरोना व्हायरस पसरू लागला होता. यानंतर काही दिवसांनी कोरोना व्हायरस चीनच्या वुहानमध्ये सापडला. कोरोना व्हायरस पसरताच अमेरिका चीनवर तुटून पडला होता.
राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक असल्याने मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे बदला घेण्याची, धडा शिकविण्याची भाषा करत होते. मात्र, अमेरिकेच्याच सरकारी संस्थेने अमेरिकेचा खोटेपणा उघड केला आहे. य़ा नवीन दाव्यामुळे पुन्हा चीन आणि अमेरिकेमध्ये तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अमेरिकी मीडियानुसार या अभ्यासात काही पुरावे सापडले आहेत. यानुसार आरोग्य संस्थांना आणि संशोधकांना या व्हायरसचे संक्रमण सापडण्याआधीच कोरोना जगभर पसरू लागला होता. सीडीसीने अमेरिकन रेड क्रॉसने घेतलेल्या 7389 रक्तांचे नमुने तपासले. यामध्ये 106 नमुन्यांमध्ये कोरोना व्हायरस सापडला आहे.
धक्कादायक म्हणजे 13 डिसेंबर ते 17 जानेवारी या काळात हे रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. कोरोना व्हायरसला विरोध करणारी अँटीबॉडी आहेत का हे तपासण्यासाठी हे नमुने चेक करण्यात आले.
रिपोर्टमध्ये संशोधकांनी म्हटले आहे की, आतापर्यंत डिसेंबरनंतर कोरोना व्हायरस अमेरिकेत आल्याचे माणले जात होते. मात्र, सार्स कोव-२ व्हाय़रस गेल्या डिसेंबरमध्येच आला असण्याची शक्यता आहे.
जगभरात कोरोनाने थैमान घालण्यास सुरुवात केल्यानंतर अमेरिका सतत चीनवर शाब्दिक हल्ले करत राहिला. ट्रम्प यांनी चिनी व्हाय़रसही म्हटले होते. मात्र, चीनने याचे खंडन केले होते. अन्य देशांनीही चीनलाच जबाबदार धरत कोरोनाची माहिती लपविल्याचा आरोप केला होता.
काही दिवसांपूर्वी चीनने भारतावरच कोरोना व्हायरसला जन्म दिल्याचा आरोप केला होता. 2019 च्या उन्हाळ्यात भारतात कोरोना व्हाय़रस तयार झाल्याचा दावा चीनने केला.
कोरोना व्हायरस प्राण्यांनी दुषित पाणी प्यायल्याने त्यांच्या माध्यमातून माणसाच्या शरिरात प्रवेश करता झाला. यानंतर तो वुहानला पोहचला असा जावईशोध चिन्यांनी लावला होता.