Corona Vaccination : ... म्हणून न्यूड क्लबमध्ये उघडले लसीकरण केंद्र! By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 05:06 PM 2021-05-24T17:06:23+5:30 2021-05-24T17:14:37+5:30
Corona Vaccination : अमेरिकेच्या लास वेगास शहरात लॅरी फ्लाइंट हसलर नावाच्या क्लबला लसीकरण केंद्र बनविण्यात आले आहे. कोरोना लस घेण्यासाठी लोकांनी अमेरिकेतील नागरिकांनी प्राधान्य द्यावे, यासाठी येथील प्रशासन पूर्ण ताकदीने काम करत आहे. नागरिकांनी लस घेतल्यानंतर त्यांना मोफत बेसबॉल गेम्सची तिकिटे, बिअर, फ्रेंच फ्राईज उपलब्ध करून देण्यात येत आहे.
आता तर अमेरिकेतील एका अनोख्या प्रयोगाद्वारे स्ट्रिप आणि न्यूड क्लबला लसीकरण केंद्र बनवण्यात आले आहे. अमेरिकेच्या लास वेगास शहरात लॅरी फ्लाइंट हसलर नावाच्या क्लबला लसीकरण केंद्र बनविण्यात आले आहे.
लोकांना लस घेण्यासाठी प्रेरित करण्याचा हा अनोखा मार्ग आहे. या प्रयत्नांनंतर लसीकरण प्रक्रिया खूप वेगवान होईल, असे साउथ नेवाडा हेल्थ डिस्ट्रिक्टच्या चीफ नर्सने 'एपी'ला सांगितले.
महत्त्वाचे म्हणजे हे क्लिनिक दिवसातील अनेक तास उघडण्यात येते. पहिल्या दिवशी सुमारे 100 लोकांना लस देण्यात आली. यामध्ये या क्लबमध्ये कार्यरत महिला, डान्सर आणि मॉडेलचा समावेश होता. यानंतर संध्याकाळी हे केंद्र पुन्हा स्ट्रिप आणि न्यूड क्लबमध्ये रूपांतरित झाले. या प्रक्रियेनंतर आसपासच्या लोकांमध्ये लसीबाबत इंटरेस्ट वाढला आहे.
एपीशी बोलताना रॉबर्टो नावाच्या व्यक्तीने सांगितले की, मी या क्लब जवळ राहतो. सुरुवातीला मी लसबद्दल गंभीरपणे विचार करीत नव्हतो, परंतु जेव्हा मला कळले की स्ट्रीप क्लब लस केंद्र बनला आहे, तेव्हा मी विचार केला की, ही लस का घेऊ नये.
या व्यतिरिक्त एक महिला सरकारच्या प्रयत्नामुळे खूपच प्रभावित दिसून आली. ती म्हणाली की, जर सरकार स्ट्रिप क्लबला लस केंद्र बनवू शकत असेल तर लोकांनी लसीकरण केलेच पाहिजे, ही बाब गंभीरपणे घेतली पाहिजे. जेव्हा मला हे लक्षात आले तेव्हा मी लस घेण्याचे ठरविले.
दरम्यान, यापूर्वी ओहायो शहरात लस घेतल्यानंतर 10 लाखांची लॉटरी संकल्पना सुद्धा सुरु करण्यात आली आहे.