'या' दोन देशांच्या सीमेवर आढळून आला भुयारी मार्ग, कोण करत होता याचा वापर? By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 03:33 PM 2022-05-20T15:33:26+5:30 2022-05-20T15:44:19+5:30
Huge tunnel with railway line : अमेरिका आणि मेक्सिकोच्या सीमेवर हा भुयारी मार्ग बनवण्यात आला आहे. या भुयारात अशा वस्तू सापडल्या ज्या फार हैराण करणाऱ्या आहेत. या भुयारात रेल्वे लाइन, वीज आणि व्हेंटिलेशनची व्यवस्थाही आहे. जगभरातील वैज्ञानिक सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टींचा शोध घेत असतात. अशातच आता दोन देशांदरम्यान बनवण्यात आलेल्या रहस्यमय आणि गुप्त भुयाराची माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी हा रहस्यमय भुयार शोधला आहे. अमेरिका आणि मेक्सिकोच्या सीमेवर हा भुयारी मार्ग बनवण्यात आला आहे. या भुयारात अशा वस्तू सापडल्या ज्या फार हैराण करणाऱ्या आहेत. या भुयारात रेल्वे लाइन, वीज आणि व्हेंटिलेशनची व्यवस्थाही आहे.
असं सांगितलं जात आहे की, मेक्सीकोच्या टिजुआना आणि अमेरिकेच्य सॅन डिएगो दरम्यान हा भुयारी मार्ग बनवण्यात आला आहे. या भुयाराची लांबी साधारण १७४४ फूट आहे आणि खोली ६१ फूट आहे. जेव्हा अधिकाऱ्यांना हा भुयार दिसला तर तेही हैराण झाले. चला जाणून घेऊ कुणी हा भुयारी मार्ग बनवला आणि कशासाठी बनवला?
मेक्सीकोच्या टिजुआना आणि अमेरिकेच्या सॅन डिएगो दरम्यानचं अंतर ३० किलोमीटरचं आहे. ड्रग्सच्या तस्करीसाठी गुन्हेगार या भुयाराचा वापर करत होते. दावा केला गेला की, गुन्हेगारांद्वारे बनवण्यात आलेला हा जगातली सर्वात मोठा भुयारी मार्ग आहे.
या भुयारातून गुन्हेगाराचं ड्रग्स आढळून आलं आहे. या ड्रग्समध्ये ७९९ किलो कोकेन, ७५ किलो मेथमफोटामीन आणि १ किलो ६०० ग्रॅम हेरोईनचा समावेश आहे. या ड्रग्सची किंमत १९३ कोटी रूपयांपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जात आहे.
मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, भुयाराजवळ सैनिकांना दोन संशयित व्यक्ती दिसले. तिथे एक वेअर हाउस होतं. अधिकाऱ्यांनी वेअर हाउसची झडती घेतली. तेव्हा त्यांना हा भुयारी मार्ग दिसून आला. अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हा भुयारी मार्ग इथे कधीपासून होता आणि याच्या माध्यमातून किती ड्रग्सची तस्करी करण्यात आली याबाबत अजून समजू शकलेलं नाही.
मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, भुयाराजवळ सैनिकांना दोन संशयित व्यक्ती दिसले. तिथे एक वेअर हाउस होतं. अधिकाऱ्यांनी वेअर हाउसची झडती घेतली. तेव्हा त्यांना हा भुयारी मार्ग दिसून आला. अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हा भुयारी मार्ग इथे कधीपासून होता आणि याच्या माध्यमातून किती ड्रग्सची तस्करी करण्यात आली याबाबत अजून समजू शकलेलं नाही.
दोन दशकादरम्यान या भागात एक डझनपेक्षा जास्त भुयारी मार्गांची माहिती मिळाली आहे. टिजुआना-सॅन डिएगो भागात सापडलेला हा ९१वा भुयार आहे. अमेरिका आणि मेक्सीकोच्या सीमेवर वर्ष १९९३ पासून आतापर्यंत २७२ भुयार सापडले आहेत. २०२० मध्ये टिजुआनामध्ये ४,३०९ फूटाचा सर्वात मोठा भुयारी मार्ग आढळून आला होता. पण आता सापडलेला भुयारी मार्ग जगातला सर्वात मोठा मानला जात आहे.