'इस्रो'चा आणखी एक 'विक्रम'; FIFA वर्ल्डकपमधील सामन्याचा रेकॉर्ड मोडला By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 04:29 PM 2023-08-24T16:29:40+5:30 2023-08-24T16:55:26+5:30
जगभरातील भारतीयांचे डोळे काल इस्रोच्या चंद्रयान मोहिमेकडे लागले होते. टिव्हीवर, मोबाईलवर, कॉम्प्युटरवर, स्क्रीनवर, जेथे मिळेल त्या प्लॅटफॉर्मवर प्रत्येकजण चंद्रयानाचा लँडींग पाहात होता. जगभरातील भारतीयांचे डोळे काल इस्रोच्या चंद्रयान मोहिमेकडे लागले होते. टिव्हीवर, मोबाईलवर, कॉम्प्युटरवर, स्क्रीनवर, जेथे मिळेल त्या प्लॅटफॉर्मवर प्रत्येकजण चंद्रयानाचा लँडींग पाहात होता.
भारताचे चंद्रयान दक्षिण धुव्रावर उतरले आणि इस्रोने इतिहास रचला. या ऐतिहासिक क्षणासह इस्रोने आणखी विक्रम रचला आहे. जगात सर्वाधिक लाईव्ह पाहिलं जाणारं यूट्यूब होण्याचा बहुमान काल इस्रोच्या नावे जमा झाला.
कॅसिमिरो नावाच्या यूट्यूबरनं २०२२ च्या फिफा वर्ल्डकपमधील ब्राझील विरुद्ध क्रोएशिया सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग केलं होतं. हा सामना ६.५ मिलियन प्रेक्षकांनी पाहिला होता.
इस्रोनं फिफा वर्ल्डकपचा हा विक्रम काल मोडीत काढला. इस्रोनं कालचं लाईव्ह ८ मिलियनपेक्षा अधिक जणांनी पाहिलं आणि इस्रोच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलनं मोठा विक्रम रचला. विशेष म्हणजे एकाच दिवसांत इस्रोचे तब्बल १३ लाख सबस्क्राईबर्सही वाढले आहेत.
चांद्रयान-३ च्या लँडिंगची प्रक्रिया ५ वाजून २० मिनिटांनी सुरू झाली. तेव्हापासून इस्रोनं लाईव्ह सुरू केलं. तेव्हापासूनच लाखो लोक यूट्यूब पाहात होते.
इस्रोला आतापर्यंत कधीच सब्सक्राईब न केलेल्या, यूट्यूबवर कधीही इस्रो सर्च न केलेल्या अनेकांनी काल चांद्रयान-३ च्या लँडिंगचा सोहळा पाहिला.
इस्रोच्या यूट्यूबवर येऊन लाईव्ह पाहणाऱ्यांची संख्या त्यांच्या सब्सक्राईबर्सपेक्षा दुप्पट होती. हा आकडा तब्बल ८ मिलियन्स लाईव्ह प्रेक्षकांपर्यंत पोहोचला होता.
काल संध्याकाळी चांद्रयान-३ ची लँडिग प्रक्रिया सुरू होण्याआधी इस्रोच्या यूट्यूब चॅनेलच्या सब्सक्राईबर्सची संख्या २.६८ मिलियन होती. मात्र लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू होताच ९ मिनिटांत २.९ मिलियन प्रेक्षक लाईव्ह पाहू लागले.
१३ मिनिटांत प्रेक्षकांचा आकडा ३.३ मिलियनवर गेला. १७ व्या मिनिटाला लाईव्ह पाहणाऱ्यांची संख्या ४ मिलियनच्या घरात पोहोचली. ३१ मिनिटांनंतर हाच आकडा ५.३ मिलियन म्हणजेच ५३ लाख इतका होता.
लाईव्ह ४५ मिनिटांच्या पुढे गेल्यानंतर लाईव्ह पाहणाऱ्यांची संख्या ६.६ मिलियनवर गेला. तर २२ तासानंतर सॉफ्ट लँडींगचे लाईव्ह पाहणाऱ्यांचा आकडा तब्बल ७२ मिलियन्सवर पोहोचला आहे.