Apart from Alphabet, Indian bosses are among the "giants" in the US
अल्फाबेटशिवाय अमेरिकेतल्या 'या' दिग्गज कंपन्यांत आहेत इंडियन बॉस By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 11:19 PM2019-12-09T23:19:02+5:302019-12-09T23:22:45+5:30Join usJoin usNext भारतीय वंशाचे सुंदर पिचाई हे आता गुगलबरोबरच अल्फाबेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनले आहेत. अल्फाबेटचे सीईओ लेरी पेज आणि अध्यक्ष सर्गे ब्रिननं आपल्या पदांचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चेन्नईत वाढलेले सुंदर पिचाई या आंतरराष्ट्रीय कंपनीचे बॉस बनले आहेत. जगातली सर्वात प्रमुख सॉफ्टवेअर कंपनी हे भारतीय वंशाचे सत्या नाडेला चालवत आहेत. 4 फेब्रुवारी 2014ला मायक्रोसॉफ्टचे सीईओ नियुक्त केलेल्या सत्या नाडेला यांना 43 मिलियन डॉलर वर्षाला पगार मिळतो. अमेरिकेतल्या आंतरराष्ट्रीय कॉम्प्युटर सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या अडोबीलाही एक भारतीय बॉस चालवत आहेत. शांतनू नारायण 2007पासून अडोबीचे चेअरमन आणि सीईओ आहेत. त्यांच्या नेतृत्वात कंपनीनं वेगानं प्रगती केली आहे. शांतनू यांना नोकरीसाठी 2017मध्ये 22 मिलियन डॉलर मिळाले होते. अमेरिकी मल्टिनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेज कंपनी मास्टरकार्डचं नेतृत्वही भारतीय वंशाच्या व्यक्तीच्या हातात आहे. अजय बंगा यांनी 2010पासून या कंपनीचा कार्यभार सांभाळलेला आहे. अध्यक्ष आणि सीईओ बंगा यांच्या नेतृत्वात कंपनीच्या समभागांची किंमत 1396 टक्क्यांनी वाढली आहे. अमेरिकी मल्टिनॅशनल सायबर सिक्युरिटी कंपनी पालो आल्टो नेटवर्कचे सीईओसुद्धा भारतीय निकेश अरोरा आहेत. निकेशनं जून 2018मध्ये कंपनीची धुरा सांभाळली आहे. त्याशिवाय सॉफ्ट बँक ग्रुपचे अध्यक्षही राहिले आहेत. त्यांना पालो आल्टोमध्ये आतापर्यंत 128 मिलियन डॉलरची सॅलरी मिळाली आहे. कॉम्प्युटर मेमरी आणि कॉम्प्युटर स्टोरेज डेटाचं उत्पादन करणारी अमेरिकन कंपनी मायक्रोन टेक्नॉलॉजीचे सीईओ भारतीय वंशाचे संजय मेहरोत्रा आहेत. मेहरोत्रा सॅनडिस्कचे को-फाऊंडर आहेत, 2011 ते 2016 पर्यंत ते कंपनीचे सीईओ-अध्यक्ष राहिले आहेत. त्यानंतर ते मायक्रोनमध्ये कार्यरत झाले. टॅग्स :सुंदर पिचईSundar Pichai