या कवियत्रीच्या कवितेला लागली इतक्या कोटींची बोली की कुणाच्याही सात पिढ्या आरामात जगतील

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 07:34 PM2021-11-19T19:34:58+5:302021-11-19T19:56:05+5:30

कलाकाराच्या प्रतिभेला तोड नसते. पैशांनी त्याची किंमत मोजणं कठीण असलं तरीही असे काही कलाकार असतात त्यांच्या प्रतिभेला कोटींची बोली लागते. इंग्लंडमधली अशीच एक कवयत्री, तिच्या जीवनात घटस्फोटाच्या दुःखानं असे काही वार केले की त्याचं दुःख कवितेच्या रुपात कागदावर उतरलं. त्याची बोली इतकी लागली की ज्यापैशात कुणाच्याही कुटुंबाच्या सात पीढ्या अगदी आरामात जगु शकतात..

लंडनमध्ये राहणाऱ्या एका कवयित्रीनं आपल्या विरहाची एक कविता केली आणि त्या कवितेला 3 कोटी रुपयांची बोली लागली.

आर्क हेड्स नावाच्या कवयित्रीच्या या कवितेला लंडनमध्ये 5 लाख 25 हजार युरोंची बोली लागली. भारतीय चलनात ही किंमत होते 3 कोटी.

ग्लॅमरस इन्स्टाग्राम स्टार आर्क हेड्स हिनं आपल्या विरहाची कथा कवितेतून मांडली आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. तिच्या या वेदनेला आता जगभर ओळख मिळत आहे.

ग्रॅमी अवॉर्ड विजेते संगीतकार RAC तिच्या कवितेवर एक फंजिबल टोकन तयार करणार आहेत. त्याचं शीर्षक असेल Arcadia. आर्क गेल्या काही दिवसांत प्रचंड लोकप्रिय झाली आहे.

आर्क हेड्स ही टोपणनावानं कविता लिहिते. तिच्या कवितेत तिच्या मनातील दुःख असतं. लग्नानंतर ५ वर्षांनी तिचा घटस्फोट झाला, त्यावेळी तिने कविता लिहिली.

चिंता, दुःख आणि एकटेपणा यांचं मिश्रण या कवितेत आहे. ही कविता मुक्तछंद प्रकारातील असून त्यात 1000 शब्द आहेत.

३ कोटी ८९ लाख रुपयांत विकल्या गेलेल्या या कवितेचा प्रत्येक शब्द किती मौल्यवान असेल, याची तुम्ही कल्पना करू शकता.

ज्याने ही कविता विकत घेतली, त्याच्याकडे आता कवितेचे सर्वाधिकार असणार आहेत. याचाच अर्थ ती व्यक्ती इतरांना ही कविता विकू शकते.

रशियात जन्मलेल्या आर्कचं कुटूंब लंडनमध्ये कामानिमित्त शिफ्ट झालं होतं. त्यानंतर तिचं नावदेखील बदलण्यात आलं.

तिला इंग्रजीदेखील बोलता येत नव्हतं. मात्र मेहनत करून तिनं भाषेवर प्रभुत्व मिळवलं.