The Arctic Bath hotel has opened its doors along the Lule River
'या' ठिकाणी आहे नदीवर तरंगणारे हॉटेल; एका दिवसाचे भाडे तब्बल... By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 07:01 PM2020-02-26T19:01:05+5:302020-04-18T15:45:18+5:30Join usJoin usNext स्वीडनमधील उत्तर भागातील लॅपलँड क्षेत्रातील ल्यूल नदीवर तरंगणारे हॉटेल 'स्पा द आर्कटिक बाथ' लोकांसाठी सुरु करण्यात आले आहे. या हॉटेलपर्यत लाकडाचे तंरगणारे रस्त आणि बोटीच्या सहाय्याने पोहचता येते. हॉटेलचे डिझाईन आर्किटेक्ट बर्टिल हॅरस्ट्रॉम आणि जोहान कोप्पीन यांनी केली आहे.याला बनवताना नैसर्गिक सुंदरतेची काळजी घेण्यात आलेली आहे. या हॉटेलमध्ये एकूण 12 खोल्या आहेत. या हॉटेलबद्दल लोकांमध्ये एवढी क्रेज आहे की 2021 वर्षामधील बुकिंग देखील सुरु करण्यात आली आहे. येथील एक दिवसाचे भाडे 815 पाउंढ (जवळपास 75 हजार रुपये) आहे. द आर्कटिक बाथ हॉटेलच्या स्पा सेंटरमध्ये वेलनेस थीमवर काम करण्यात आलेले आहे. येथे आहार, व्यायाम आणि मनाच्या शांतीसाठी विशेष मेडिटेशन थेरेपी दिली जाईल. स्पा द आर्कटिक हॉटेल उन्हाळ्याच्या दिवसात नदीवर तरंगेल. मात्र जेव्हा हिवाळ्यात बर्फ जमा होईल, तेव्हा हॉटेल देखील नदीवर गोठले जाईल.टॅग्स :हॉटेलआंतरराष्ट्रीयhotelInternational