...तर 'ते' धोकादायक ठरु शकतात; पृथ्वीच्या दिशेने आज येणार ३ संकटं, वैज्ञानिकांचं बारकाईनं लक्ष By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 11:23 AM 2020-07-24T11:23:12+5:30 2020-07-24T11:27:20+5:30
अवकाशात आज तीन महत्त्वाच्या घटना घडणार आहेत. ही तीनही संकट पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहेत. संपूर्ण जगभरातील वैज्ञानिक या घटनेकडे बारकाईनं नजर ठेवून आहेत. जेणेकरून त्यांच्या दिशेत थोडा बदल झाला तरीही चेतावणी दिली जाऊ शकते.
अॅस्ट्रोइड किंवा उल्का म्हणून ओळखले जातात. परंतु जेव्हा ते पृथ्वीच्या दिशेने येतात तेव्हा ते धोकादायक ठरू शकतात. जर या उल्कापिंडाची टक्कर झाली तर ते मोठ्या प्रमाणात नुकसानही करु शकतात
आज अर्थात २४ जुलैला अंतराळातून येणाऱ्या पहिल्या उल्कापिंडाचे नाव Asteroid 2020 ND आहे. याचा वेग १३.५ किलोमीटर प्रति सेकंद आहे. ते १७० मीटर लांबीचे आहे. हे पृथ्वीपासून सुमारे ५०.८६ लाख किलोमीटर अंतरावरुन जाणार आहे. तथापि, अंतराळातील हे अंतर जास्त मानले जात नाही. कारण हे अंतर एका क्षणात कमी होऊ शकते
सामान्यत: मंगळ आण गुरु ग्रहाच्या कक्षेत अशाप्रकारच्या उल्कापिंडाची संख्या मोठ्या प्रमाणात असते. पण पृथ्वीच्या जवळून जाणाऱ्या उल्कांची संख्या कमी असते. अशा परिस्थितीत जर कोणताही लघुग्रह पृथ्वीच्या जवळ आल्यास धोका वाढतो.
अशा उल्कापिंडांचे खगोलशास्त्रज्ञ त्यांना संभाव्य धोकादायक लघुग्रह (पीएचए) म्हणतात. हे ते प्रमाण आहे ज्यामध्ये अवकाश शास्त्रज्ञ पृथ्वीवर येण्याच्या धोक्यांप्रमाणे मोजले जाणाऱ्या घटकात समाविष्ट करतात.
जर Asteroid 2020 ND थेट पृथ्वीवर आदळला तर तो जवळपास अर्ध्या जगाचा नाश करू शकतो. तथापि, असा अंदाज आहे की, हा उल्कापिंड पृथ्वीपासून दूरवरुन जात आहे, त्यामुळे कोणतेही नुकसान होण्याची शक्यता नाही.
Asteroid 2020 ND पृथ्वीच्या दिशेने १३.५ किलोमीटर प्रति सेकंद म्हणजेच ४८ हजार किलोमीटर प्रति तास वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे. जेव्हा अशा वस्तू पृथ्वीजवळ येतात तेव्हा त्यांना Near Earth Objects - NEO असं म्हणतात.
दुसरी उल्का म्हणजे २०१६ DY 30 हे पृथ्वीपासून सुमारे ३४ लाख किमी अंतरावरुन जाणार आहे. तर २०२० ME3 पृथ्वीपासून ५६ लाख किलोमीटर अंतरावरुन जाणार आहे. सर्वात जवळून अॅस्ट्रोइड 2016 DY 30 जाणार आहे.
अॅस्ट्रोइड 2016 डीवाय 30 ची गती ५४ हजार किलोमीटर प्रति तास आहे. तर 2020 ME 3 ची वेग ताशी १६ हजार किलोमीटर आहे. अॅस्ट्रोइड 2016 डीवाय 30 ची रुंदी फक्त १५ फूट आहे. परंतु जर ते जमिनीवर आदळले तर ते मोठ्या प्रमाणात नुकसान करेल.
वास्तविक लघुग्रह म्हणजेच अॅस्ट्रोइड्स किंवा उल्का मुळात ग्रहांचे तुकडे असतात. या तुकड्यांचा जन्म या ग्रहांच्या जन्मापासूनच झाला आहे. या ग्रहांमध्ये पृथ्वी, बुध, शुक्र व मंगळ यांचा समावेश आहे. हे तुकडे अनेकदा अवकाशात फिरत पृथ्वीच्या जवळून जातात.