Australia Fire: Steve Irwin's family has saved more than 90,000 animals injured in fire
ऑस्ट्रेलिया आग: या एका कुटुंबाने 90 हजार प्राण्यांना वाचवलं; करावं तेवढं कौतुक कमीच! By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 09:31 PM2020-01-07T21:31:48+5:302020-01-07T21:35:13+5:30Join usJoin usNext ऑस्ट्रेलियात जंगलात लागलेल्या आगीने आतापर्यंत 23 जणांचा बळी घेतला. जवळपास ५५ लाख हेक्टर जमिनीला आगीने ओढलं होतं. यात ५० कोटीपेक्षा अधिक मुक्या प्राण्यांचा जीव गेला. अनेक प्राण्यांना वाचवण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी धाव घेतली होती. यामध्ये स्टीव्ह आयर्विन या वन्यप्रेमीच्या कुटुंबाने तब्बल ९० हजार प्राण्यांचा जीव वाचवून त्यांना रुग्णालयात दाखल केले. हे सर्व प्राणी एकाच कुटुंबाने वाचवल्यामुळे अनेकांनी त्यांचे भरभरुन कौतुक केलं आहे. आयर्विन कुटुंबाकडून झु हॉस्पिटल चालविण्यात येतं. मागील १६ वर्ष या हॉस्पिटलने २४ तास प्राण्यांना सेवा पुरविली आहे स्टीव्ह आयर्विन हे वन्यजीवप्रेमी आणि प्राणिसंग्रहलायचे मुख्य होते. २००६ साली विषारी स्टींगरे माशाच्या चाव्यामुळे त्यांचा जीव गेला. मगर हा त्यांच्या अभ्यासाचा मुख्य विषय होता. आयर्विन कुटुंबाने त्यांची परंपरा पुढे कायम ठेवली आहे. याबाबत बिंदी आयर्विन सांगतात की, माझ्या पालकांनी आमची ऑस्ट्रेलिया प्राणिसंग्रहालय वन्यजीव रुग्णालय माझ्या सुंदर आजीला समर्पित केले. बिन्डी आयर्विन यांनी इंस्टाग्रामवर लिहिले आहे की, वाइल्डलाइफ वॉरियर्स बनून आणि जितके शक्य असेल तितके जीव वाचवून आम्ही प्रयत्न करु. टॅग्स :ऑस्ट्रेलिया भीषण आगवन्यजीवAustralia firewildlife