Baba Vanga: 2022 मध्ये भारतावर भीषण उपासमारीचं संकट, एलियन्सचा होणार हल्ला; बाबा वँगा यांची खतरनाक भविष्‍यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 08:24 PM2021-12-26T20:24:02+5:302021-12-26T20:36:29+5:30

असे म्हटले जाते, की बाबा वेंगा यांनी केलेल्या जवळपास 85 टक्के भविष्यवाण्या सत्य सिद्ध झाल्या आहेत. त्यांच्या भविष्यवाण्यांमध्ये 5079 पर्यंतचा उल्लेख आढळतो.

काही दिवसांतच 2022 वर्ष येऊन ठेपणार आहे आणि जग त्याचे स्वागत करण्यासाठी आतूरतेने वाट पाहत आहे. गेल्या वर्षाप्रमाणेच या वर्षातही जगभरात कोरोनाचे थैमान सुरू आहे. असे असतानाच, हे नवे वर्ष आपल्यासाठी आणि संपूर्ण जगासाठी काय घेऊन येणार, याबद्दल सर्वच जण चिंतित आहेत.

यातच, बल्गेरियाच्या (Bulgaria) बाबा वँगा (Baba Vanga) नावाने परिचित असलेल्या दृष्टिहीन वॅंगेलिया पांडव गुस्टेरोवा (Vangelia Pandava Gusterova) यांनी 2022 वर्षासाठी धक्कादायक भविष्यवाणी केली आहे. बाबा वँगा यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वीच जगाबद्दल विविध भाकीतं करून ठेवली आहेत.

बाबा वँगा यांच्या मते, भारतातील तापमान (Baba Venga Prediction for India) 50 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असेल. यामुळे पिकांवर नाकतोड्यांचा हल्ला होईल, त्यामुळे भारतात दुष्काळ पडेल.

2022 मध्ये जगातील प्रमुख शहरे पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे प्रभावित होतील, नद्यांच्या प्रदूषणामुळे पाण्याची कमतरता भासेल. एवढेच नाही, तर 2022 मध्ये लोक आपला जास्तीत जास्त वेळ स्क्रीनवर घालवतील, म्हणजेच लोक संगणक आणि मोबाईलवर अधिक वेळ घालवतील, असा अंदाजही बाबा वँग यांनी व्यक्त केला आहे.

भविष्यवाणी करणाऱ्या बाबा वँग यांच्या मते, संशोधकांचा एक समूह सयबेरियामध्ये एका जीवघेण्या विषाणूचा शोध लावेल. ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमनद्या वितळतील आणि हा विषाणू मुक्त होईल. त्यानंतर परिस्थिती अनियंत्रित होईल.

2022 मध्ये भूकंप आणि त्सुनामीचा धोका वाढणार - बाबा वँगा यांच्या मते, 2022 मध्ये जगात भूकंप आणि त्सुनामीचा धोका वाढेल. हिंदी महासागरात भूकंपानंतर मोठी त्सुनामी येईल, याचा ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंडोनेशिया आणि भारतासह जगातील देशांच्या किनारी भागांना मोठा फटका बसेल. या त्सुनामीत शेकडो लोकांचा मृत्यू होईल. एवढेच नाही, तर एलियन्सकडून ओमुआमुआ नावाचा एक लघुग्रह पृथ्वीवर पाठवला जाईल, असा दावाही त्यांनी केला आहे.

बाबा वँगा यांच्या 'या' भविष्यवाणी ठरल्या आहेत खऱ्या - 'बाल्कनचा नॉस्ट्राडेमस' म्हणून ओळखल्या जाणारा दृष्टीहीन बाबा वँगा यांनी 2022 वर्षासाठी केलेल्या भविष्यवाण्यांनी इंटरनेटवर जगतात खळबळ उडाली आहे. यापूर्वी त्यांनी 9/11 चा हल्ला आणि ब्रेक्झिट संकटाची अचूक भविष्यवाणी केली होती. सोव्हिएत युनियनचे विघटन, 2001 मधील 11 सप्टेंबरचा हल्ला, प्रिन्सेस डायनाचा मृत्यू आणि चेरनोबिल आपत्ती संदर्भातील त्यांचे दावे सत्य सिद्ध झाले आहेत.

वयाच्या 12 व्या वर्षीच वँगेलिया पांडव गुस्टेरोवा यांनी आपली दृष्टी गमावली. आपल्याला भविष्याकडे बघण्यासाठी देवाकडून ही एक देणगी मिळाली असल्याचा दावा त्यांनी केला होता. 1996 मध्ये वयाच्या 85 व्या वर्षी मृत्यूपूर्वी त्यांनी 2022 संदर्भात धक्कादायक भविष्यवाणी केली होती.

असे म्हटले जाते, की बाबा वेंगा यांनी केलेल्या जवळपास 85 टक्के भविष्यवाण्या सत्य सिद्ध झाल्या आहेत. त्यांच्या भविष्यवाण्यांमध्ये 5079 पर्यंतचा उल्लेख आढळतो.