baby dies after being given turtles blood to drink to protect her from coronavirus kkg
CoronaVirus News: कोरोनापासून बचाव करण्यासाठी चिमुकलीला पाजलं कासवाचं रक्त; अन्... By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 05:55 PM2020-05-28T17:55:03+5:302020-05-28T18:09:32+5:30Join usJoin usNext जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. जगभरात तब्बल ५८ लाखांहून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनामुळे मृत पावलेल्यांचा आकडा साडे तीन लाखांपेक्षा जास्त आहे. जवळपास सगळ्याच देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनावरील लसीचा शोध अद्याप लागलेला नाही. मात्र अनेक भागांमध्ये उपचाराचा भाग म्हणून केले जाणारे प्रयोग जीवघेणे ठरत आहेत. कॅरेबियन बेटांवरील डॉमिनिकन रिपब्लिक या देशात कोरोनापासून बचाव करण्यासाठी एका ५ महिन्यांच्या चिमुरडीला रक्त पाजण्यात आलं. त्यानंतर तिचा मृत्यू झाला. हैथीमधल्या एका डॉक्टरनं एका कुटुंबाला कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी कासवाचं रक्त पिण्याचा सल्ला दिला होता. कासवाचं रक्त प्यायल्यानंतर ५ महिन्यांच्या वर्षांच्या चिमुकलीनं प्राण सोडला. तर तिच्या सात वर्षीय बहिणीला आणि पालकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कासवाचं रक्त पाजण्यात आल्यानंतर चिमुरड्या मुलीची प्रकृती बिघडली. तिला रोसा डुअर्टे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता, अशी माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली. प्राण्यांचं रक्त गुणकारी असतं, त्यामुळे विषाणूपासून बचाव होतो, असा अनेकांचा समज आहे. मात्र असे प्रयोग जीवावर बेततात, असं रुग्णालयाच्या संचालिका डॅहियाना वोलक्वेझ यांनी सांगितलं. ऑगस्ट २०१२ मध्ये याच कुटुंबातले चौघे जण हैथीमध्ये मृतावस्थेत आढळून आले होते. त्यांना रहस्यमयी आजारानं ग्रासलं होतं. त्यावेळी एका भोंदूबाबानं भूतबाधा झाल्याचं सांगून कुटुंबातल्या सदस्यांना मारहाण केली. शरीरात भूत उतरवण्याचा दावा त्यानं केला होता. या मारहाणीत चौघांचा मृत्यू झाला.टॅग्स :कोरोना वायरस बातम्याcorona virus