Beirut Blast: लेबनान भीषण स्फोटात शहर उद्धवस्त; पाहा आधीचे आणि आताचे फोटो... By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 02:30 PM 2020-08-05T14:30:10+5:30 2020-08-05T14:47:57+5:30
लेबनानची राजधानी असललेल्या बैरुतमध्ये मंगळवारी संध्याकाळी दोन भीषण स्फोट झाले. या स्फोटामुळे अर्धे शहर उद्धवस्त झाले असून बचावलेल्या लोकांना अजूनही हादरा बसला आहे. जवळपास १० किलोमीटरपर्यंतचा परिसर पूर्णपणे नष्ट झाला आहे. रस्त्यांवर मृतदेहांचे ढीग पडलेले आहेत.
तुम्ही या फोटोमध्ये पाहू शकता आधी सुंदर आणि नयनरम्य दिसत असलेल्या इमारती स्फोटामुळे भुईसपाट झाल्या आहेत.
या घटनेत जवळपास 78 ठार तर 4000 जण जखमी झाल्याची माहिती आरोग्य मत्र्यांनी दिली आहे.
या स्फोटांचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. स्थानिकांनी सांगितल्याप्रमाणे हा स्फोट इतका तीव्र होता की, घराच्या खिडक्या, फॉल्स सिलिंग तुटल्या. बेरुतच्या पत्तननजीक हा स्फोट झाला असावा असा अंदाज आहे.
या स्फोटांचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. स्थानिकांनी सांगितल्याप्रमाणे हा स्फोट इतका तीव्र होता की, घराच्या खिडक्या, फॉल्स सिलिंग तुटल्या. बेरुतच्या पत्तननजीक हा स्फोट झाला असावा असा अंदाज आहे.
हे स्फोट पोर्ट भागात झाले. तिथे वर्षभारापूर्वी अतिसंवेदनशील स्फोटकं आणि साहित्य जप्त करण्यात आली होती. ही स्फोटकं एका ठिकाणी ठेवण्यात आली होती. त्यांचा स्फोट झाला असावा, अशी शक्यता लेबनानच्या गृहमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
तर कित्येक टन नायट्रेटचा स्फोट झाल्याची माहिती सीमा शुल्क (customs) विभागाचे संचालकांनी दिली, असं लेबननाच्या माध्यमांकडून वृत्त देण्यात येत आहे.