बिल गेट्स म्हणाले - 'भारतात संपूर्ण जगाला कोरोना वॅक्सीन देण्याची आहे क्षमता' By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 11:00 AM 2020-07-17T11:00:31+5:30 2020-07-17T11:20:00+5:30
बिल गेट्स डिस्कव्हरी चॅनलवरील डॉक्यमेंट्री 'COVID-19: India's War Against The Virus' मध्ये भारताच्या समर्थनात बोलताना दिसले. मायक्रोसॉफ्टचे को-फाउंडर बिल गेट्स म्हणाले की, भारताकडे इतकी क्षमता आहे की, ते साऱ्या जगासाठी कोविड-१९ ची वॅक्सीन बनवून ती सप्लाय करू शकतात. भारतीय औषध उद्योगात केवळ आपल्या देशासाठी नाही तर साऱ्या जगासाठी वॅक्सीन तयार करण्याची क्षमता आहे.
बिल गेट्स म्हणाले की, भारतीय औषध उद्योग भारतातील कोरोना रूग्णांना औषध देऊ शकतो. सोबत जगातील इतरही रूग्णांना कोरोना व्हायरसची वॅक्सीन सप्लाय करू शकतो.
ते म्हणाले की, भारतात कोरोना व्हायरस वॅक्सीन तयार करण्याबाबत महत्वपूर्ण काम झालं आहे. केवळ वॅक्सीन तयार करण्यासाठी नाही तर कोरोनाशी संबंधित रिसर्चमध्येही भारतीय वैज्ञानिक आणि औषध कंपन्यांनी जगाला फार मदत केली आहे.
बिल गेट्स डिस्कव्हरी चॅनलवरील डॉक्यमेंट्री 'COVID-19: India's War Against The Virus' मध्ये भारताच्या समर्थनात बोलताना दिसले. पण सोबतच ते हेही म्हणाले की, भारतात जास्त लोकसंख्या आणि शहरांमध्ये लोकसंख्येचं घनत्व जास्त असल्याने कोरोनाला नष्ट करण्यात अडचण येत आहे.
बिल गेट्स डिस्कव्हरी चॅनलवरील डॉक्यमेंट्री 'COVID-19: India's War Against The Virus' मध्ये भारताच्या समर्थनात बोलताना दिसले. पण सोबतच ते हेही म्हणाले की, भारतात जास्त लोकसंख्या आणि शहरांमध्ये लोकसंख्येचं घनत्व जास्त असल्याने कोरोनाला नष्ट करण्यात अडचण येत आहे.
गेट्स म्हणाले की, भारतीय औषध उद्योग इतर वेळीही जगासाठी कोणत्याही देशांपेक्षा जास्त वॅक्सीन विकसित करतो. ते वेगवेगळ्या वॅक्सीन तयार करतात आणि सप्लाय करतात. सीरम इन्स्टिट्यूट तेथील सर्वात मोठी औषध कंपनी आहे.
सीरम इन्स्टिट्यूटसोबतच बायो ई, भारत बायोटेकसारख्या कंपन्याही आहेत. ज्या कोरोना व्हायरसची वॅक्सीनसाठी काम करत आहे. केवळ कोरोना व्हायरसच नाही तर या कंपन्या सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार शोधण्याचं काम करतात.
बिल गेट्स यांनी सांगितले की, भारत कोलिशन फॉर एपिडेमिक प्रीपेअर्डनेस इनोव्हेशन नावाच्या समूहात सहभागी आहे. जेणेकरून जगभरातील औषध कंपन्यांसोबत मिळून कोरोना व्हायरसच्या वॅक्सीनवर रिसर्च, डेव्हलपमेंट, निर्मिती आणि सप्लाय करू शकतील.
भारतीय औषध कंपन्यांकडे इतकी क्षमता आहे की, ते कोरोना व्हायरसने होणारा मृत्यूदर कमी करू शकतात. बिल गेट्स यांची फाउंडेशन भारत सरकार आणि येथील मेडिकल रिसर्च सेंटरच्या सतत संपर्कात आहे.
भारतातील कोरोना व्हायरसच्या संक्रमणाबाबत बिल गेट्स म्हणाले की, कोरोना व्हायरसचं संक्रमण भारतात अजून फार प्राथमिक स्तरावर आहे. पण या स्तरावरच भारताने अनेत महत्वपूर्ण काम केले आहेत. भारतासारख्या लोकसंख्या जास्त असलेल्या देशात कोरोनावर कंट्रोल मिळवणं फार कठिण काम आहे. या देशातील लोक फार सक्रिय आहेत. ते इकडे-तिकडे पळत असतात. त्यामुळे कोरोनाला थांबवणं थोडं कठिण आहे.
बिल गेट्स शेवटी म्हणाले की, भारतात तरूण, वैज्ञानिक, इमरजन्सी सेवेतील लोकांना हे समजतं की, हा व्हायरस किती धोकादायक आहे. औषध कंपन्यांकडे मोठ्या प्रमाणात मानव संसाधन आहे. ते औषध तयार करण्यासाठी तयार आहे. पण सोबतच गरज आहे बेरोजगार लोकांपर्यंत जेवण पोहोचवण्याची, जेणेकरून ते उपाशी राहू नयेत.