Omicron : बिल गेट्स यांचा इशारा...! घरा-घरात ओमायक्रॉन पोहोचणार, एकही देश नाही वाचणार; सर्व हॉलिडे प्लॅन केले कॅन्सल By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 07:08 PM 2021-12-22T19:08:38+5:30 2021-12-22T19:19:06+5:30
बिल गेट्स यांनी संक्रमणासंदर्भात एकामागून एक सलग 7 ट्विट केले आहेत. आपण लवकरच महामारीच्या सर्वात वाईट काळातून जाऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी Omicron व्हेरिअंटसंदर्भात गंभीर इशारा दिला आहे. त्यांनी संक्रमणासंदर्भात एकामागून एक सलग 7 ट्विट केले आहेत. आपण लवकरच महामारीच्या सर्वात वाईट काळातून जाऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
बिल गेट्स म्हणाले, त्यांचे जवळचे मित्र या नव्या संक्रमणाने संक्रमित झाले आहेत. यामुळे लोकांनी सावधगिरी बाळगायला हवी. या नव्या व्हेरिअंटचा धोका लक्षात घेता, त्यांनी सुट्टीचे सर्व प्लॅन्स रद्द केले आहेत. एवढेच नाही तर, गेट्स यांनी मास्क घालण्याचा, लस घेण्याचा आणि गर्दी न करण्याचाही सल्ला दिला आहे.
ओमिक्रॉनचा संक्रमण दर अधिक - गेट्स पुढे म्हणतात, ओमिक्रॉनचा हा नवा व्हेरिअंट पूर्वीच्या कोरोना व्हायरस व्हेरिअंट्सच्या तुलनेत अधिक वेगाने पसरत आहे. तो लवकरच जगातील प्रत्येक देशाला आपल्या कवेत घेईल. यासंदर्भात आपल्याला आणखी फारशी माहितीही नाही.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, ओमायक्रॉन आपल्याला किती प्रमाणावर आजारी करतो, हेही आपल्याला माहीत नाही. तो डेल्टाच्या तुलनेत अर्धा प्रभावी असता तरी, ही चिंतेची बाब आहे, कारण त्याचा प्रसार प्रचंड वेगाने होतो, असेही बिल गेट्स यांनी म्हटले आहे.
अमेरिकेत वाढतेय कोरोना रुग्णांची संख्या - अमेरिकेत ओमाक्रॉन बाधितांची संख्या वेगाने वाढत आहेत. तेथे गेल्या एका आठवड्यात कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी ७३ टक्के नवे रुग्ण ओमायक्रॉन बाधित आहेत. यापूर्वी ही संख्या केवळ ३ टक्के होती. अशी परिस्थिती असतानाच बिल गेट्स यांनी हा इशारा दिला आहे.
पॉझिटिव्ह नोटने केला समारोप - बिल गेट्स शेवटी म्हणाले, यातच एक चांगली बातमी अशी की, ओमायक्रॉन अत्यंत वेगाने पुढे जातो. एखाद्या देशात पसरल्यानंतर, संसर्गाची लाट 3 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत संपते. एवढेच नाही, तर जग नेहमीसाठीच असे राहणार नाही. एक दिवस महामारी संपेल. जर आपण एकमेकांची काळजी घेतली तर ही वेळ लवकरच येईल, असेही गेट्स म्हणाले.
WHO चा इशारा अन् सूचना - भारतातही कोरोनाच्या नव्या Omicron व्हेरिअंटचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले आहेत. यातच WHO ने लोकांना इशाऱ्यांसोबतच काही सूचनाही दिल्या आहेत. जगभरात ओमायक्रॉनच्या वाढत्या केसेसमुळे येणाऱ्या सण-उत्सवांवरही विरजन पडू शकते, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, आपण बेफिकीरपणे लग्न-पार्टी आणि समारंभांचा आनंद घेत असाल तर थोडे सावध राहा. सर्व प्रतिबंधात्मक उपाय करत राहा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींनाही संपूर्ण लसीकरण करून घेण्याचा सल्ला द्या, अशा आशयाच्या सूचनाही डब्ल्यूएचओने दिल्या आहेत.
बिल गेट्स यांचे ट्विट...
बिल गेट्स यांचे ट्विट्स...
बिल गेट्स यांचे ट्विट्स...