The Bir Tawil Desert is in the middle of the Egypt and Sudan borders
'या' जागेवर कोणत्याच देशाचा अधिकार नाही; पण भारतीय नागरिकाने केला होता दावा By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 03:16 PM2020-01-30T15:16:11+5:302020-01-30T15:23:15+5:30Join usJoin usNext पृथ्वीवर अशा काही जागा आहेत की त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कायद्यानूसार नो मॅन्स लँड श्रेणीत येतात. मात्र नो मॅन्स लँडच्या जागेवर कोणीही कायदेशीर दावा करु शकतो. अफ्रिकेत बीर ताविल नावाचे एक वाळवंट आहे, ज्याच्यावर कोणत्याच देशाचा अधिकार नाही. बीर ताविल वाळवंट इजिप्त आणि सूदान सीमेच्या मध्यभागी आहे. इजिप्त आणि सूडानने 20 व्या शतकात आपल्या सीमा या प्रकारे बनवल्या की, या भागावर कोणाचाच अधिकार राहिला नाही. मध्य प्रदेशच्या इंदौर येथे राहणाऱ्या सुयश दीक्षितने 2017 साली बीर ताविलचा राजा व वडिलांना पंतप्रधान म्हणून स्वतःला घोषित केले होते. बीर ताविलला ‘किंगडम ऑफ दिक्षित’असे नाव देऊन ध्वज देखील तयार केला होता. मात्र अमेरिकन नागरिक जेरेमिया हिटॉन यांनी ही जागा आपली असून, सुयश दीक्षित खोटं बोलत असल्याचा दावा केला. 2014 मध्ये जेरेमिया हिटॉन बीर ताविल येथे गेले होते. त्यावेळी त्यांनी या जागेवर दावा केला होता. या जागेला त्यांनी 'किंग्डम ऑफ नॉर्थ सुदान' असे नावही दिले होते.टॅग्स :भारतआंतरराष्ट्रीयIndiaInternational