Bird Flu Human Infection: न भूतो! घातक बर्ड फ्ल्यू विषाणूची पहिल्यांदाच माणसाला लागण; रशियात H5N8 चे सात रुग्ण By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2021 03:14 PM 2021-02-21T15:14:26+5:30 2021-02-21T15:19:18+5:30
Bird Flu Human Infection: घातक असलेल्या व आतापर्यंत पक्ष्यांमध्येच लागण असलेल्या बर्ड फ्ल्यूच्या घातक H5N8 विषाणूने माणसांमध्येही हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. रशियात या विषाणूने बाधित सात रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. कोरोनानंतर जगभरात पसरलेल्या बर्ड फ्ल्यूने आता झोप उडविण्यास सुरुवात केली आहे. घातक असलेल्या व आतापर्यंत पक्ष्यांमध्येच लागण असलेल्या बर्ड फ्ल्यूच्या घातक H5N8 विषाणूने माणसांमध्येही हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. रशियात या विषाणूने बाधित सात रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.
रशियाच्या आरोग्य यंत्रणांनी मोठी खबरदारी घेण्यास सुरुवात केली असून H5N8 ने पॉझिटीव्ह आढळलेल्या रुग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवले आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरु केला आहेत.
या आधी कधीच बर्ड फ्ल्यूची लागण माणसाला झालेली नव्हती. हा पहिला प्रकार समोर आल्याने जगभरात मोठी खळबळ उडाली आहे.
व्हेक्टर रिसर्च सेंटरचे वैज्ञानिक अन्ना पॉपोवा यांनी रशियन मीडियाला याची माहिती दिली आहे. रशियामध्ये एव्हिअन इन्फ्यूएन्झा ए व्हायरसच्या H5N8 स्ट्रेनने माणसाला संक्रमित केले आहे. अशा प्रकारची ही पहिलीच वेळ आहे
हे सातही रुग्ण रशियातील एका पोल्ट्री फार्मचे कर्मचारी आहेत. वैज्ञानिकांनी या सातही जणांना आयसोलेट केले आहे. या भागात डिसेंबर 2020 मध्ये बर्ड फ्ल्यूचा उद्रेक पहायला मिळाला होता.
पॉपोवा यांनी सांगितले की, सर्व सात लोक आता स्वस्थ आहेत. त्यांच्या शरिरात H5N8 स्ट्रेनच्या संक्रमणाचे खूपच हलकी लक्षणे दिसत आहेत. तरीही सावधगिरी म्हणून त्यांना आयसोलेट केले आहे. या बाधितांवर वैज्ञानिक सतत लक्ष ठेवून आहेत. रशियात अन्य ठिकाणी अशाप्रकारचे H5N8 स्ट्रेनने बाधित आणखी रुग्ण अद्याप सापडलेले नाहीत.
एव्हिअन इन्फ्यूएन्झा किंवा एव्हिअन फ्ल्यूला बर्ड फ्ल्यू म्हटले जाते. हा विषाणू पक्ष्यांमध्येच पसरतो. पक्षी मेलेला असेल किंवा जिवंत असेल, तो संक्रमित असेल तर हा रोग माणसांनाही होतो.
बर्ड फ्लू साठी एच5एन1विषाणू जबाबदार असतो. मात्र, या विषाणूचा नवीन स्ट्रेन H5N8 जास्त घातक आणि संक्रमण करणारा आहे. तो जुन्या विषाणूपेक्षा जास्त खतरनाक आहे.
बर्ड फ्ल्यूचे संक्रमण झालेला पक्षी भक्षण केल्यास त्याद्वारे अन्य प्राण्यांमध्येही बर्ड फ्ल्यू होण्याची शक्यता आहे. तसेच बर्ड फ्ल्यू पाण्यात राहणाऱ्या बदकांमध्ये जास्त आढळतो, परंतू तो कोंबड्यांमध्ये जास्त प्रमाणात पसरतो.
गेल्या महिन्यात भारतातही बर्ड फ्ल्यू पसरला होता. मात्र, प्रशासनाच्या सावधगिरीमुळे पक्षी मारल्य़ाने याची व्याप्ती कमी झाली होती.