बॉस असावा तर असा ! स्वत:चे वेतन कमी करून कर्मचाऱ्यांना दिली घसघशीत पगारवाढ By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 05:01 PM 2020-03-02T17:01:19+5:30 2020-03-02T17:27:37+5:30
पगार आणि त्यात मिळणारी वार्षिक वाढ हा नोकरीधंदा करणाऱ्या प्रत्येकासाठी जिव्हाळ्याचा विषय. बऱ्याचदा पगारवाढ ही कंपनीचे आर्थिक धोरण आणि वरिष्ठांच्या कलानुसार होत असते. पगार आणि त्यात मिळणारी वार्षिक वाढ हा नोकरीधंदा करणाऱ्या प्रत्येकासाठी जिव्हाळ्याचा विषय. बऱ्याचदा पगारवाढ ही कंपनीचे आर्थिक धोरण आणि वरिष्ठांच्या कलानुसार होत असते.
आज आम्ही तुम्हाला एका अशा बॉसबाबत सांगणार आहोत ज्याने स्वत:चे वेतन घटवून आपल्या कंपनीमधील कर्मचाऱ्यांना घसघशीत पगारवाढ दिली आहे.
डेन प्रिस असे या बॉसचे नाव आहे. अमेरिकेतील सिएटल येथे कार्ड पेमेंट कंपनी चालवणाऱ्या प्रिस यांची वार्षिक कमाई कोट्यवधींच्या घरात होती. दरम्यान, प्रिस यांनी अचानक आपला पगार मोठ्या प्रमाणावर घटवण्याची आणि प्रत्येक कर्मचाऱ्याला किमान ५० लाख रुपये वार्षिक पगार देण्याची घोषणा केली.
डेन प्रिस यांनी कुमारवयातच पेमेंट कंपनी सुरू केली होती. सध्या त्यांची कंपनी चांगला व्यवसाय करत आहे.
काही वर्षांपूर्वी त्यांच्या एका निकटवर्तीयाला दोन नोकऱ्या करूनही पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याचे त्यांनी पाहिले. तेव्हा आपल्याही कंपनीत पगाराचे प्रमाण असमान आहे, हे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी स्व:चा पगार घटवून इतर कर्मचाऱ्यांचा पगार वाढणवण्याच निर्णय घेतला.
ग्रेव्हिटी पेमेंट्स चालवणाऱ्या डेन प्रिस यांनी यांनी २०१५ मध्ये प्रथम आपल्या सर्व १२० कर्मचाऱ्यांचे वार्षिक वेतन ५० लाख रुपये करण्याची घोषणा केली. तसेच आपले वार्षिक वेतन ८ कोटींवरून घटवून १ कोटींवर आणले. त्यांच्या कंपनीत आजही ही पद्धत कायम आहे. तसेच डेन प्रिस यांनी आपले वेतन किमान पातळीवर राखले आहे.
डेन प्रिस हे आता अमेरिकेत असमानतेविरोधात लढणारा चेहरा बनले आहेत.
डेन प्रिस यांनी वेतनाबाबत मांडलेली कल्पना ही आगळीवेगळी अशीच म्हणावी लागेल.
कुणालातरी उंच इमारतीमधील आलिशान पेंट हाऊसमधील सोन्याच्या खुर्चीवर बसता यावे म्हणून लोकांकडून काम करून घेतले जाते. कधी हे लोक उपाशी राहतात किंवा त्यांना नोकरीवरून हटवले जाते, असे डेन प्रिस म्हणतात.