घरात पॉर्न बघत होता मुलगा, हुकूमशहा किम जोंग उनने पूर्ण परिवाराला सुनावली शिक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 01:02 PM2021-03-22T13:02:34+5:302021-03-22T13:15:37+5:30

किम जोंग उनने पॉर्न विरोधातील आपली लढाई आणखी मजबूत करत नुकतीच पॉर्न बघणाऱ्यां विरोधात कठोर कारवाई केली आहे.

आपल्या कठोर निर्णयांसाठी ओळखला जाणारा उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. किम जोंग उनने पॉर्न विरोधातील आपली लढाई आणखी मजबूत करत नुकतीच पॉर्न बघणाऱ्यां विरोधात कठोर कारवाई केली आहे. एका तरूण पॉर्न बघत असल्याने त्याच्या संपूर्ण परिवाराला शिक्षा सुनावण्यात आली आहे.

जगभरातील अनेक देशांमध्ये पॉर्न बघणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू झाली आहे. अशात उत्तर कोरियातून ही बातमी समोर आली आहे. एक मुलगा रात्री त्याचे आई-वडील घरी नसताना पॉर्न व्हिडीओ बघत होता. तपास करत असलेल्या टीमची नजर त्याच्या अॅक्टिविटीवर पडली तर त्याला पकडण्यात आलं.

डेली एनकेच्या रिपोर्टनुसार, उत्तर कोरियातील सत्तारूढ वर्कर्स पार्टी स्कूलमध्ये पॉन विरोधात अभियान चालवलं जात आहे. यादरम्यान पोलिसांनी मुलाची ही अॅक्टिविटी पाहिली तर ते तिथे पोहोचले. शिक्षा म्हणून मुलगा आणि त्याच्या परिवाराला उत्तर कोरियातील दुसऱ्या भागात पाठवण्यात आलं.

किम जोंगने गेल्यावर्षी पॉर्न विरोधात अभियान सुरू केलं होतं. किम जोंग म्हणाला की, अशाप्रकारे विचार एखाद्या ट्यूमरसारखे आहे. उत्तर कोरियाने पॉर्न सिनेमांवर लगाम लावण्यासाठी कायदा बनवला आहे. यानुसार दोषींना ५ ते १५ वर्षांचीं शिक्षा आणि जबरदस्तीने त्यांच्याकडून काम करून घेतलं जाऊ शकतं.

इतकेच नाही तर अशा वस्तू आयात करणाऱ्या लोकांना लेबर कॅम्पमध्ये आयुष्यभर राहणं किंवा मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाऊ शकते. शाळेच्या मुख्यध्यापकालाही जबरदस्ती काम करण्यासाठी लेबर कॅम्पमध्ये पाठवण्यात आलं आहे.

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन आपल्या कठोर निर्णयांसाठी प्रसिद्ध आहे. कोरोना काळातही त्याने कठोर गाइडलाइन जारी केली होती. मात्र, सुरूवातीला त्यांना दावा केला होता की, त्यांच्या देशात कोरोना व्हायरसची एकही केस नाही.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच उत्तर कोरियाचा लीडर किम जोंग उन यांची पत्नी एका सार्वजनिक कार्यक्रमात दिसली होती. ती गेल्या वर्षभरापासून सार्वजनिक कार्यक्रमांमधून गायब झाली होती. त्यामुळे वेगवेगळ्या शंकाही व्यक्त केल्या जात होत्या.

जगातील अनेक देशांनी पॉर्न विरोधातील मोहिम कठोर केली आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातही पॉर्नवर बंदी घातली गेली. यासाठी १०९० हा क्रमांक सुरू करण्यात आला. ज्याद्वारे पोलीस पॉर्न बघणाऱ्यांची माहिती मिळवू शकतात.

उत्तर प्रदेशात ठरवण्यात आले की, आर्टिफिशिअल इंटॅलिजन्स आणि सायकोग्राफिक्ससारख्या अत्याधुनिक टेक्नीकचा वापर करत चाइल्ड पोर्नोग्राफीसंबंध सर्च करणाऱ्या लोकांना 'पॉप अप मेसेज' च्या माध्यमातून सॅनिटाइज केलं जाईल.

Read in English