brazil also threatened to break ties with who corona virus america
WHO च्या अडचणीत वाढ; ब्राझीलनेही दिली 'ही' धमकी! By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 10:58 AM2020-06-08T10:58:12+5:302020-06-08T11:14:56+5:30Join usJoin usNext कोरोना व्हायरसवरून चीन आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) विरोधात अमेरिकेनंतर आता इतर देशांचाही रोष वाढत आहे. अमेरिकेनंतर ब्राझीलने जागतिक आरोग्य संघटनेसोबतचे संबंध तोडण्याची धमकी दिली आहे. ब्राझीलने जागतिक आरोग्य संघटनेने पक्षपात आणि राजकारण केल्याचा आरोप केला आहे. ब्राझीलने जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची धमकी दिली आहे. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेअर बोल्सोनारो यांनी जागतिक आरोग्य संघटना निष्पक्ष नसल्याचा आरोप केला आहे. अमेरिकेने पैसे देणे थांबवताच संघटनेने आपले सर्व आश्वासने फिरवल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. या आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मे महिन्याच्या अखेरीस म्हणाले होते की, अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेशी संबंध तोडेल. तसेच, कोरोना व्हायरसच्या बाबतीत जागतिक आरोग्य संघटनेने चीनवर जास्त विश्वास ठेवला, असाही आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेला सर्वाधिक जास्त पैसे देत होते. यातच ब्राझीलने 2019 मध्येच पैसे देणे बंद केले. एका वृत्तपत्राच्या म्हणण्यानुसार, जागतिक आरोग्य संघटनेची ब्राझीलकडे ३३ मिलियन डॉलरची थकबाकी आहे. कोरोना व्हायरसमुळे ब्राझील हा जगातील सर्वात त्रस्त देशांपैकी एक आहे. ब्राझीलमध्ये 6 लाख 46 हजाराहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 35 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसची उत्पत्ती कोठून झाली, याची सध्या चौकशी सुरू आहे. मात्र, अमेरिकेतील मिसौरी राज्याने चीनविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिसौरी हे चीनविरोधात गुन्हा दाखल करणारे पहिले राज्य ठरले आहे. चीनने कोरोना कोरोना व्हायसरबाबत माहिती लपविली. तसेच. ज्या लोकांनी हे समोर आणले, त्यांना अटक केली, असा आरोप चीनवर केला जात आहे. कोरोना व्हायरसची उत्पती कोठून झाली. याविषयी निष्पक्ष तपासणीचा मसुदा प्रस्ताव 73 व्या जागतिक आरोग्य संघटनेमध्ये सादर करण्यात आला. या प्रस्तावात भारतासह 100 हून अधिक देशांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, सौदी अरेबिया, आफ्रिकन गट आणि युरोपियन युनियन या देशांनाही कोरोना व्हायरस कोठे व कसा पसरला? हे जाणून घ्यायचे आहे. या प्रस्तावावर कोणत्याही देशावर आरोप केलेला नाही, मात्र, जिनपिंग यांनी चीनचा बचाव करीत असे म्हटले की आम्ही जागतिक आरोग्य संघटना आणि इतर देशांना वेळेत सर्व काही सांगितले होते. टॅग्स :कोरोना वायरस बातम्याब्राझीलजागतिक आरोग्य संघटनाcorona virusBrazilWorld health organisation