मोकळा श्वास ! 28 जूननंतर या देशात बंधनकारक नसणार मास्क By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 12:19 PM 2021-06-24T12:19:43+5:30 2021-06-24T12:31:16+5:30
इटलीमध्ये, २८ जूनपासून मास्क घालणे बंधनकारक नसणार आहे आणि संपूर्ण देश मास्क फ्री होणार आहे. देशाच्या आरोग्य मंत्रालयाने सोमवारी माहिती देताना मास्कचे बंधन हटविण्यात येत असल्याचे सांगितले. देशातील कोरोनाची लाट ओसरल्यानंतर आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर, दुसरीकडे गतवर्षी करोनाने थैमान घातलेल्या इटलीत 28 जूनपासून नागरिकांना मुक्त श्वास घेता येणार आहे.
कारण, 28 जूनपासून इटलीमध्ये मास्कविना चालता-बोलता येणार असल्याचे इटलीचे आरोग्यमंत्री यांनी सांगितलंय.
गेल्या वर्षी युरोपमधील इटलीमध्ये करोनामुळे हाहाकार माजला होता. त्यानंतर आता इटलीने करोनावर मात करत मास्क पासून मुक्तता मिळवली आहे.
अवघी सहा कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशामध्ये करोनाच्या सुरुवातीच्या काळात जगभरात झालेल्या मृत्यूंपैकी सर्वाधिक संख्या होती.
त्याच इटलीमध्ये आता मास्क घालणे अनिवार्य नसणार आहे. इटलीमध्ये, २८ जूनपासून मास्क घालणे बंधनकारक नसणार आहे आणि संपूर्ण देश मास्क फ्री होणार आहे.
देशाच्या आरोग्य मंत्रालयाने सोमवारी माहिती देताना मास्कचे बंधन हटविण्यात येत असल्याचे सांगितले.
आरोग्यमंत्री रॉबर्टो स्पेरन्झा यांनी व्हायरस किती वेगाने पसरत आहे, याबद्दल फेसबुकवर लिहिले आहे. यासाठी इटलीमध्ये वर्गीकरण प्रणाली तयार केली गेली आहे.
त्यानुसार व्हाईट झोनमधील लोकांना आता मास्क घालण्याची गरज भासणार नाही असे म्हटले आहे. २८ जूनपर्यंत इटलीतील सर्व भाग हे ‘व्हाइट’ झोन म्हणून घोषीत केले जातील असे तज्ज्ञांचे मत आहे.
सोमवारी, इटलीमध्ये करोनाचे केवळ ४९५ नवीन रुग्ण आढळून आले. तर २१ लोकांचा मृत्यू झाला.
२०२० च्या सुरुवातीला इटलीमध्ये करोनाव्हायरसचा प्रसार झाल्यापासून, देशातील मृतांची संख्या १ लाख २७ हजार २९१ झाली आहे. ४२.५ लाख नागरिकांना करोनाचा संसर्ग झाला आहे.
आतापर्यंत, १२ वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकसंख्येच्या ३० टक्के लोकांना लसी दिली गेली आहे. सहा कोटी लोकसंख्या असलेल्या इटलीमध्ये त्यांचा वाटा १.२ कोटी नागरिकांना लस देण्यात आली आहे.