अमेरिकेत चहा विकून तिनं कमावले तब्बल 200 कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2018 16:05 IST2018-05-07T16:05:55+5:302018-05-07T16:05:55+5:30

अमेरिकेत राहणाऱ्या ब्रुर इडी हिनं चहा विकून तब्बल 200 कोटी रुपये कमावले आहेत. विशेष म्हणजे 2002 मध्ये ब्रुर भारतात आली असताना तिला ही कल्पना सुचली.
2002 मध्ये ब्रुरनं उत्तर भारतातील अनेक गावांना भेटी दिल्या. तिथं तिनं आलं घातलेल्या चहाची चव चाखली. तेव्हापासून ती चहाच्या प्रेमात पडली.
भारतातील चहाच्या प्रेमात पडलेल्या ब्रुकनं कोलोरॅडोमध्ये जाऊन चहाचा व्यवसाय सुरू केला. 2007 मध्ये तिनं 'भक्ती चाय' या नावानं स्टार्टअप सुरू केला.
चहाची अशी वेगळी चव कधीही न चाखलेल्या अमेरिकेतील अनेकांना हा चहा खूपच आवडला. यामधून तिनं कोट्यवधी रुपयांची कमाई केली
भक्ती चायमध्ये मिळणारा वेगवेगळ्या चवीचा चहा चाखण्यासाठी नेहमीच गर्दी असते.