या इमारतींच्या छतावरून वेगळेच दिसते जग By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 08:40 PM 2019-07-16T20:40:14+5:30 2019-07-16T20:55:02+5:30
इमारतीच्या छतावरून आजूबाजूच्या जगाकडे पाहणे हा एक वेगळाच अनुभव असतो. जाणून घेऊया अशाच पाच इमारतींविषयी ज्यांच्या छतावरून अप्रतिम नजारा दिसतो.
बुर्ज खलिफा 2,716 फूट उंच असलेली बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत आहे. येथे सुमारे 100 डॉलर खर्च करून तुम्ही येतील 124 व्या मजल्यावरून आजूबाजूचे विहंगम जग पाहू शकता.
केंटन टॉवर, ग्वांग्झो 2010 मध्ये जेव्हा याचे उदघाटन झाले तेव्हा याची ओळख जगातील सर्वात उंच टीव्ही टॉवर अशी करून देण्यात आली होती.
टोकियो स्ट्रिट, टोकियो या टॉवरच्या शिखरावरून हवामान चांगले असल्याच तुम्ही माऊंट फुजी पाहू शकता.
जिन माओ टॉवर, शांघाई शांघाईमधील जिन माओ टॉवर ही एक सुंदर इमारत आहे. येथील लिफ्ट अवघ्या 45 सेकंदांमध्ये तुम्हाला 88 व्या मजल्यापर्यंत पोहोचवते.
ओरियंट पर्ल टॉवर, शांघाई ओरियंट पर्ल टॉवरचे बांधकाम 1995 मध्येच पूर्ण झाले होते. दूरवरून हा टॉवर पाहिल्याच 11 वेगवेगळे चेंडू दिसतात.