चार्जिंगसाठी लावली होती Tesla ची इलेक्ट्रिक कार, पूर्ण घराला लागली आग!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 04:50 PM2021-08-06T16:50:57+5:302021-08-06T17:01:05+5:30

Tesla Car Fire : योगी विंडमने याबाबत सांगितलं की, आमच्याकडे २०१३ चं टेस्ला मॉडल एस ८५ आहे. आम्ही ही इलेक्ट्रिक कार रात्रभर चार्जिंगसाठी लावली होती

अमेरिकेतील एका कपलने दावा केला आहे की, प्रसिद्ध इलेक्ट्रिक कार टेस्ला मॉडल एस कारला त्यांनी चार्जिंगला रात्री लावली होती. ज्यामुळे त्यांच्या घराचं मोठं नुकसान झालं. या कारने चार्जिंगला लावल्यावर आग पकडली आणि ही आग तिथे असलेल्या दुसऱ्या टेस्ला कारनेही पकडली. ज्यामुळे त्यांचं पूर्ण घर जळालं.

वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टनुसार, योगी आणि केरोलिन विंडम कॅलिफोर्नियाच्या सॅन रेमोनमध्ये राहतात. गेल्या ३० डिसेंबरला ही घटना घडली होती आणि या घटनेला ८ महिने उलटूनही कपल घरी परतलं नाही. विंडम कपलनुसार, या दुर्घटनेत १ मिलियन डॉलरपेक्षा अधिक नुकसान झालं आहे.

विंडम कपलने 'द पोस्ट' सोबत बोलताना सांगितलं की, कारच्या अलार्ममुळे आम्ही सकाळी ५.३७ ला उठलो. आम्हाला दिसलं की, पूर्ण घरात धुराचे लोळ पसरले आहेत. ते बघून आम्ही फार घाबरलो होतो. जर आम्ही घराच्या वरच्या मजल्यावर झोपलो असतो तर आमचा जीव वाचायचा चान्स कमी होता.

योगी विंडमने याबाबत सांगितलं की, आमच्याकडे २०१३ चं टेस्ला मॉडल एस ८५ आहे. आम्ही ही इलेक्ट्रिक कार रात्रभर चार्जिंगसाठी लावली होती. कारमध्ये चार्जिंग दरम्यान आग लागली आणि यामुळे बाजूला पार्क केलेली दुसरी टेस्ला कारही पेटली. ज्यामुळे मोठा विस्फोट झाला.

या कपलने सांगितलं की, स्फोटामुळे गॅरेजचा दरवाजा तुटला. इतकंच नाही तर रूम्स आणि बाथरूमचंही नुकसान झालं. ते घराच्या मागच्या भागात असल्याने त्यांना यात काही इजा झाली नाही. विंडम कपलने या दुर्घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे.

विंडम कपलने सांगितलं की, दुर्घटना किती गंभीर होती याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, दुर्घटनेनंतर ६ फायर ट्रक घटनास्थळी पोहोचले होते. यावर्षी जुलैमध्ये विंडम कपलला फायर इन्स्पेक्शन रिपोर्ट मिळाला होता. यात लिहिले होते की, कारच्या थर्मल मॅनेजमेंट सिस्टीम किंवा इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये गडबड झाल्याने कारमध्ये आग लागली होती.

दरम्यान, टेस्ला कंपनीच्या काही दिवसांपासून अनेक तक्रारी समोर येत आहेत. जुलैमध्ये एका टेस्ला मॉडल एस कारने फिलाडेल्फियामद्ये चालत्या गाडीत आग पकडली होती.

Read in English