कॅलिफोर्नियात भीषण वणवा, 7 हजार हेक्टर जंगल भस्मसात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 16:03 IST2017-10-10T15:55:13+5:302017-10-10T16:03:51+5:30

अमेरिकेतील कॅलिफोर्निया इतिहासातील सर्वात मोठया आगीत होरपळून निघालं आहे.
वणव्यामुळे लागलेली आग इतकी मोठी आहे की, या आगीत जवळपास 7 हजार हेक्टर जंगल जळून खाक झालं आहे तर 1500 घरं भस्मसात झाली आहेत.
कडक ऊन आणि वेगवान वाऱ्यांमुळे हा वणवा कॅलिफॉर्निय़ातल्या 7 जिल्ह्यांमध्ये पसरला.
अॅनहेम जिल्ह्यातील नागरिकांना घरं खाली करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.