china admits coronavirus not started from wuhan market kkg
CoronaVirus News: ...अन् चीननं मारली पलटी; कोरोना आणि वुहानबद्दल दिली मोठी माहिती By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 03:21 PM2020-05-31T15:21:33+5:302020-05-31T15:33:53+5:30Join usJoin usNext चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोनामुळे आतापर्यंत जवळपास पावणे चार लोकांचा जीव गेला आहे. तर ६० लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. चीनच्या वुहानमधून कोरोचा फैलाव झाल्याचं चीन सरकारकडून सांगण्यात आलं होतं. मात्र प्राण्यांच्या मांसाची विक्री करणाऱ्या एका बाजारातून कोरोना पसरला यावर जगभरात कोणाचाही विश्वास बसला नाही. चीनच्या वुहान बाजाराच्या कहाणीवर फारसा कोणीच विश्वास ठेवला नाही. त्यामुळेच कोरोनाचा फैलाव नेमका कुठून झाला, याची आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी होऊ लागली. कोरोना प्रकरणाच्या चौकशीला चीन सहकार्य करेल. मात्र ती निष्पक्ष असावी, त्यावर कोणाचाही दबाव नसावा, अशी भूमिका चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी मांडली. वुहानमधल्या बाजारातून कोरोनाचा फैलाव झाला, असं चीन आतापर्यंत सातत्यानं सांगत होता. मात्र आता चीननं मोठा यू-टर्न घेतला आहे. चीनच्या सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनचे संचालक गाओ फू यांनी वुहानच्या बाजारातून कोरोना पसरला नसल्याचं म्हटलं आहे. ग्लोबल टाईम्सनं याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 'प्राण्यांच्या मांसामध्ये विषाणू असू शकतं, असं आम्हाला सुरुवातीला वाटलं होतं. मात्र वुहानच्या बाजाराला विनाकारण व्हिलन करण्यात आल्याचं आम्हाला कळतंय. कोरोना विषाणू आधीपासूनच अस्तित्वात होता,' असं गाओ फू म्हणाले. जानेवारीत आपण स्वत: वुहानला गेलो होतो. मात्र तिथल्या कोणत्याही प्राण्याच्या मांसाच्या नमुन्यात विषाणू सापडला नाही, असं गाओ फू यांनी सांगितलं. कोरोना विषाणूची उत्पत्ती नेमकी कुठून झाली, याचा शोध घेण्यासाठी चीनचे संशोधक काम करत असल्याचं फू म्हणाले. विशेष म्हणजे कोरोना विषाणू वुहानच्या बाजारातून पसरला, यावर अमेरिकेसह जगातल्या कोणत्याच राष्ट्रानं कधीही विश्वास ठेवलेला नाही. वुहानच्या बाजारापासून काही अंतरावरच वुहान व्हायरॉलॉजी इंस्टिट्यूट आहे. तिथूनच कोरोना विषाणू पसरला, असा संशय संपूर्ण जगाला आहे. चीनबद्दल संशय वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे वुहानमधल्या मांस विक्री बाजारातून कोरोना विषाणू पसरल्याचा दावा केल्यानंतर चीननं कधीही त्या मांसाचे नमुने जगाला दाखवलेले नाहीत. वुहानच्या बाजारातून कोरोना पसरला, इतकीच माहिती चीननं जगाला दिली. त्यानंतर स्थानिक प्रशासनानं बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला.Read in Englishटॅग्स :कोरोना वायरस बातम्याचीनcorona viruschina