China army ready with tank, where will China take such a big action?
टँक-हत्यारं घेऊन चीनचं लष्कर सज्ज, कुठे करणार चीन इतकी मोठी कारवाई? By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 06:54 PM2019-08-19T18:54:53+5:302019-08-19T18:58:20+5:30Join usJoin usNext हॉंगकॉंगमध्ये मागील आठवड्यापासून चीनविरोधात प्रदर्शन सुरु आहे. प्रत्यार्पण विधेयकाविरुद्ध आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन निषेध केला आहे. हॉंगकॉंगचे प्रमुख कैरी लैम यांचा राजीनामा आणि लोकशाही अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे चीनने आंदोलनकर्त्यांवर मनुष्यबळाचा वापर करु अशा इशारा दिला आहे. शेनझेन बे स्पोर्ट्स सेंटरमध्ये ११ ऑगस्टला टँक, ट्रक आणि अन्य गाडींसोबत मिलिट्री पोहचली आहे. त्याठिकाणी शेकडोच्या संख्येने जवान तैनात केलेत. कोणतीही खातरजमा न करता चीनकडून मोठी कारवाई होऊ शकते. दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनने जर हॉंगकॉंगमध्ये कारवाई केली तर त्याचा परिणाम व्यापारावर होईल. कम्युनिस्ट चीनच्या इतिहासात सर्वात मोठं राजकीय आंदोलन रोखण्यासाठी १९८९ मध्ये बीजिंगच्या तियानमेन स्क्वायरमध्ये सैन्याने कारवाई केली होती. त्यात हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. बीजिंगमध्ये हॉंगकॉंग पॉलिसी प्रकरणात रिसर्च इंस्टीट्यूट संचालक तिआन फिलॉन्ग यांनी सांगितले की, बीजिंगच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांसोबत बोलणं सुरु आहे. त्यांचे म्हणणं आहे की, चीन संपूर्ण परिस्थितीवर नजर ठेऊन आहे.अद्याप चीनने हस्तक्षेप केला नाही. मात्र गरज भासल्यास चीन कारवाई करु शकतं. हॉंगकॉंग सरकारकडून आणण्यात येणाऱ्या प्रत्यार्पण कायद्याविरोधात जूनपासून आंदोलन करतंय. जो कोणी सरकारविरोधात आंदोलन करेल त्याला चीनमध्ये पाठविण्यात येणार अशी तरतूद कायद्यात आहे. लोकांनी केलेल्या विरोधानंतर १५ जूनला हे विधेयक मागे घेण्यात आलं होतं. टॅग्स :चीनchina