China bet on corona for 'this' reason; People are now partying without hesitation
'या' कारणामुळे कोरोनाला रोखण्यात चीनने मारली बाजी; लोक आता बिनधास्त करतायेत पार्ट्या By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 07:27 PM2020-10-12T19:27:11+5:302020-10-12T19:53:11+5:30Join usJoin usNext जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोनापुढे प्रगत देशही हतबल झाले आहेत. जगभरात लाखो लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, कोरोनाची सुरुवात चीनमधून झाली असली तरी कोरोनावर नियंत्रित मिळवणाऱ्या देशांमध्ये चीन आघाडीवर आहे. चीनकडे अशी कोणती रणनीती आहे, ज्यामुळे जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेला हा देश कोरोना व्हायरसचा प्रसार वाढू देत नाही. याचे एक उत्तर म्हणजे, चीनमध्ये लोकांची कोरोना चाचणी मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. त्यामुळे चीनमधील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत आहे. अलीकडेच, चीनच्या किंगडाओ शहरात कोरोनाच्या काही प्रकरणांची नोंद झाली. त्यामुळे संपूर्ण शहरातील लोकांची कोरोना चाचणी अवघ्या पाच दिवसांत पूर्ण करण्याचा निर्णय येथील सरकारने निर्णय घेतला आहे. म्हणजेच पाच दिवसांत ९० लाख लोकांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. स्थानिक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, किंगडाओ शहरातील पाच जिल्ह्यांमधील सर्व लोकांची कोरोना चाचणी तीन दिवसांत पूर्ण होईल. गेल्या काही दिवसांत याठिकाणी १२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. त्यानंतर चीनने संपूर्ण शहरातील लोकांची कोरोना चाचणी करण्याचे ठरविले. परदेशातून येणाऱ्या लोकांची ज्यावेळी किंगडाओमधील एका रुग्णालयात तपासणी करण्यात आली. त्यावेळी काही जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, रुग्णालयाशी संबंधित १.४ लाख कर्मचारी, रुग्ण आणि इतर व्यक्तींची कोरोना चाचणी आधीच करण्यात आली आहे. मोठ्या संख्येने लोकांच्या कोरोना चाचण्या करण्यात येत असल्यामुळे चीनमधील लोकांचे जीवन सामान्य बनू लागले आहे. लोक मोठ्या पार्ट्या आणि इतर कामांमध्ये भाग घेत आहेत आणि सरकार अशा अनेक कार्यक्रमांना प्रोत्साहन देत आहे, जेणेकरून जगात चीनची प्रतिमा चांगली बनू शकेल. याआधी जून महिन्यात चीनची राजधानी बिजिंगच्या मोठ्या भागातील लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचवेळी वुहानमध्ये १९ दिवसांत शहरातील सर्वच लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. चीनमध्ये फक्त ८५, ६०० लोकांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद आहे. तर कोरोनामुळे ४,६३४ जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकृत आकडेवारीनुसार समजते.टॅग्स :कोरोना वायरस बातम्याआरोग्यचीनcorona virusHealthchina