Corona Virus : बापरे! चीनमध्ये कोरोनाचा पॅनिक अलार्म; औषधांसाठी नाही तर संत्र्यांसाठी लोकांची मारामारी By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 02:21 PM 2022-12-24T14:21:16+5:30 2022-12-24T14:41:07+5:30
China Corona Virus : एका ठिकाणी संत्र्यांसाठी लोकांमध्ये धक्काबुक्की, मारामारी झाली आहे. कोरोनाच्या संकटात लोकांनी संत्री विकत घेण्यासाठी गर्दी केली आहे. चीनमध्ये कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. व्हायरसचा सामना करणारे लोक आता रस्त्यावर उतरले आहेत. शी जिनपिंग सरकारच्या हुकुमशाही विरोधात त्यांनी हल्लाबोल केला आहे. चीन जगापासून कोरोनाचे आकडे लपवत आहे. पण तेथील जनता सोशल मीडियाच्या माध्यमातून सत्य समोर आणत आहे.
कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. औषधांसाठी नाही तर इम्युनिटी वाढवणाऱ्या फळांसाठी लोकांची झुंबड उडाली आहे. एका ठिकाणी तर संत्र्यांसाठी लोकांमध्ये धक्का-बुक्की, मारामारी झाली आहे. कोरोनाच्या संकटात लोकांनी संत्री विकत घेण्यासाठी गर्दी केली आहे.
शांघाईच्या हेल्थ सेंटरचा एक व्हिडीओ समोर आली आहे. ज्याला कोरोना डिटेंशन सेंटर म्हणतात. येथे लोकांच्या गोंधळ पाहायला मिळत आहे. लोक मोठ्याने ओरडत आहेत. काही महिला या सेंटरमधून पळून जाण्यासाठी दरवाजा तोडत आहेत. लाथा मारत आहेत. त्यांना घरी जायचं आहे. (फोटो - आजतक)
चीनमध्ये कोरोनाच्या नव्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णालयात जागाच शिल्लक नाही. बीजिंगच्या सर्वात मोठ्या स्मशानात अंत्यसंस्कारासाठी कित्येक तास वाट पाहावी लागत आहे. रिपोर्टनुसार, चीनमध्ये दररोज दहा लाख रुग्ण समोर येत आहेत. तर 24 तासांत पाच हजार जणांचा मृत्यू होत आहे. (फोटो - आजतक)
जर असंच सुरू राहिलं तर रुग्णांच्या आकडा मोठ्या संख्येने वाढत आहे. शेकडो लोक रोज लांबच लांब रांगेत उभं राहून उपचारासाठी वाट पाहत आहेत. औषधांच्या किमती कित्येक पटीने वाढल्या आहेत. तसेच डॉक्टरांची देखील मोठी कमतरता आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. (फोटो - आजतक)
कोरोना व्हायरसच्या नवीन लाटे दरम्यान, लोक आता संसर्गाशी लढण्यासाठी नैसर्गिक उपायांकडे वळत आहेत. बीजिंग आणि शांघाईसह चीनमधील अनेक शहरांमध्ये लिंबू आणि इतर काही फळांची विक्री तेजीत आहे. बीजिंग आणि शांघाई, सध्या ही दोन शहरे कोविड-19 मुळे सर्वाधिक प्रभावित आहेत.
अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की लोक त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी असलेल्या गोष्टी खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत. आतापर्यंत कोणताही अधिकृत अहवाल आणि त्याच्या पुराव्यांवरून व्हिटॅमिन सी कोरोना व्हायरस बरा करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते याची पुष्टी झालेली नाही.
लिंबू आणि व्हिटॅमिन सी असलेल्या फळांव्यतिरिक्त, चीनमध्ये ताप, वेदना कमी करणारी आणि फ्लूची औषधांची मागणी वाढली आहे. ते खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. चीनमध्ये कोरोनावरील निर्बंध शिथिल केल्यानंतर संसर्गाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. मृत्यूच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.
चीनमध्ये भीषण परिस्थिती पाहायला मिळत आहे. चीन सरकारच्या सर्वोच्च आरोग्य प्राधिकरणाच्या अंदाजानुसार, या आठवड्यात एका दिवसात चीनमध्ये सुमारे 3 कोटी 70 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. हे आकडे जगभरात केलेल्या दाव्यांपेक्षा जास्त आहेत.
बुधवारी चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या अंतर्गत बैठकीच्या मिनिटांनुसार डिसेंबरच्या पहिल्या 20 दिवसांत किमान 248 मिलियन लोकांना म्हणजेच जवळपास 18% लोकसंख्येला या व्हायरसची लागण झाली असण्याची शक्यता आहे. बीजिंगचे झिरो कोविड धोरण रद्द केल्यामुळे लोकसंख्येमध्ये अत्यंत संसर्गजन्य कोरोनाच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटचा वेगाने प्रसार झाला आहे.
चीनमध्ये कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुन्हा एकदा कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. वेगाने वाढत असलेल्या रुग्णांच्या संख्येने जगाचं टेन्शन वाढवलं आहे. धडकी भरवणारं चित्र सध्या चीनमध्ये पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने रुग्णालयं खचाखच भरली आहेत.
एकही बेड उपलब्ध नसल्याने जमिनीवर रुग्णांना ठेवून उपचार केले जात आहेत. तसेच मृतांचा आकडा वाढल्याने शवागृहही भरली आहे. मृतदेहांचे ढीग पाहायला मिळत आहेत. अंत्यसंस्कारासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कोरोनामुळे आरोग्य यंत्रणा पार कोलमडली आहे. औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.