Artificial Sun: चीनपाठोपाठ ब्रिटनने तयार केला कृत्रिम सूर्य, उत्सर्जित झाली प्रचंड ऊर्जा By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 04:42 PM 2022-02-10T16:42:16+5:30 2022-02-10T16:51:26+5:30
Artificial Sun: चीननंतर आता ब्रिटनच्या शास्त्रज्ञांनी कृत्रिम सूर्य तयार करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. ब्रिटिश शास्त्रज्ञांनी सूर्याच्या तंत्रावर आधारित अणुविखंडन घडवून आणणारा एक रिअॅक्टर सुरू केला आहे. चीननंतर आता ब्रिटनच्या शास्त्रज्ञांनी कृत्रिम सूर्य तयार करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. ब्रिटिश शास्त्रज्ञांनी सूर्याच्या तंत्रावर आधारित अणुविखंडन घडवून आणणारा एक रिअॅक्टर सुरू केला आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाजवळ करण्यात आलेल्या या प्रयोगावेळी तब्बल ५९ मेगाजूल ऊर्जा या रिअॅक्टरमधून बाहेर पडली. हा जगातील एक रेकॉर्ड आहे. एवढ्या प्रमाणावर ऊर्जा निर्माण करणयासाठी १४ किलो टीएनटीचा वापर करावा लागतो.
हा जबरदस्त प्रोजेक्ट जॉईंट युरोपियन टोरुसन कुल्हॅम येथे पूर्णत्वास नेला. हे यश म्हणजे संशोधन क्षेत्रातील मैलाचा दगड असल्याचे तज्ज्ञ म्हणत आहेत. या तंत्रामुळे पृथ्वीवर स्वस्त आणि स्वच्छ उर्जा मिळवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. लॅबने ५९ मेगाजूल उर्जेची निर्मिती करून १९९७ मधील रेकॉर्ड मोडला. ब्रिटनच्या परमाणू उर्जा प्राधिकरणाने बुधवारी या यशस्वी प्रयोगाची घोषणा केली.
जेईटी लॅबमध्ये लावलेली टोकामॅक मशीन जगातील सर्वात मोठी आणि सर्वात शक्तिशाली आहे. दर महिन्याच्या आत खूप कमी मात्रेमध्ये ड्युटीरियम आणि ट्रीटीयम भरण्यात आला. हे दोन्हीही हायड्रोजनचे आयसोटोप आहेत. ड्युटीरियमला हायड्रोटन म्हटले जाते. त्याला सूर्याच्या तुलनेत १० पट अधिक गरम केले जाते. जेणेकरून प्लाझ्माची निर्मिती करता येईल.
याला सुपर कंडक्टर इलोक्ट्रोमॅग्नेटचा वापर करून एका ठिकाणी ठेवण्यात आले आहे. ते फिरल्यावर मोठ्या प्रमाणात उर्जा निर्माण झाली. ही उर्जा सुरक्षित असते. तसेच यामधून एक किलो कोळसा, तेल किंवा गॅसपासून निर्माण होणाऱ्या उर्जेच्या तुलनेत ४० लाख पट अधिक ऊर्जा निर्माण होते.
अणू विखंडन तंत्रामध्ये सूर्यामध्ये उष्णता निर्माण करण्यासाठी ज्या तंत्राचा वापर होतो, त्याच प्रकारच्या तंत्राचा वापर केला जातो. या तंत्राच्या माध्यमातून मानवजातीला भविष्यात मोठ्या प्रमाणावर सुरक्षित आणि स्वच्छ उर्जेचा स्त्रोत मिळेल, अशी अपेक्षा आहे.