पाकिस्तान पुन्हा चीनपुढे नतमस्तक; मिळाला चिनी कोरोना लसीचा आधार By जयदीप दाभोळकर | Published: January 23, 2021 09:39 AM2021-01-23T09:39:20+5:302021-01-23T09:50:29+5:30Join usJoin usNext कोरोना प्रतिबंधात्मक लसीची वाट पाहणाऱ्या पाकिस्तानला चीनकडून मदतीचा हात मिळाला आहे. चीन याच महिन्याच्या अखेरिस पाकिस्तानला पाच लाख डोस गिफ्टच्या रूपात देणार आहे. पाकिस्तानचं वृत्तपत्र 'द एक्स्प्रेस ट्रिब्यून'च्या वृत्तानुसार पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग सी यांच्याशी यासंदर्भात फोनवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी यासंदर्भातील घोषणा केली. चीनचा हा निर्णय उत्तम असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच कोरोनाच्या कालावधीत आपला मित्र चीनकडून पाकिस्तानला मिळालेली ही आनंदाची बातमी असल्याचंही ते म्हणाले. या कोरोना लसी घेऊन जाण्यासाठी पाकिस्तानला चीननं आपलं कार्गो विमान पाठवण्यास सांगितलं आहे, अशी माहितीही कुरेशी यांनी दिली. काही दिवसांपूर्वी पाकिस्ताननच्या ड्रग रेग्युलेटरी ऑथोरिटीनं चीनच्या सिनोफार्म आणि ऑक्सफर्ड अॅस्ट्राझेनकाच्या लसींना मंजुरी दिली होती. त्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान सरकार चिनी कंपन्या सिनोफार्म आणि कॅनसिनो यांच्याशी लस खरेदीसाठी चर्चा करत आहे. पाकिस्तानला याव्यतिरिक्त आणखी १० लाख डोसची आवश्यकता असेल. ते आम्हाला फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत मिळणार आहेत, असंही कुरेशी म्हणाले. "चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संबंध उत्तम आहेत. दोन्ही देशांमधील उत्तम संबंध पाहता पाकिस्ताननं कोरोनाची लस घेण्यासाठी चीनची पहिली निवड केली आहे," असंही कुरेशी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. याव्यतिरिक्त कुरेशी यांनी ट्विटरवरदेखील चीनचं कौतुक केलं आहे. कोरोनाच्या विरोधात लढा देण्यासाठई चीननं पाकिस्तानला तांत्रिक आणि आरोग्य सेवांमध्ये मदत करून महत्त्वाची भूमिका साकारली आहे, असंही त्यांनी नमूद केलं आहे. चिनी लसीचे उत्तम परिणाम आणि दोन्ही देशांमधील संबंध पाहता पाकिस्ताननं सिनोफार्मच्या आपात्कालिन वापरास मंजुरी दिली आहे. तसंच चीननं पाकिस्तानला भेट म्हणून दिलेल्या ५ लाख लसींबाबात पाकिस्तान आभारी असल्याचंही ते म्हणाले. आपल्या देशातील ७० टक्के जनतेला कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचं लक्ष्य पाकिस्ताननं ठेवलं आहे. अशा परिस्थितीत त्यांना कोट्यवधी डोसेसची आवश्यकता आहे. टॅग्स :पाकिस्तानचीनकोरोनाची लसकोरोना वायरस बातम्याPakistanchinaCorona vaccinecorona virus