China is in great fear due to army coming into power in Myanmar
म्यानमारच्या सत्तापालटानं चीनची झोप उडाली; लष्कर सत्तेत आल्यानं ड्रॅगनला सतावतेय मोठी भीती! By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 04:48 PM2021-02-02T16:48:38+5:302021-02-02T16:58:13+5:30Join usJoin usNext चीन आणि भारताला लागून असलेल्या म्यानमारमध्ये सोमवारी लष्कराने बंड करून सत्तापालट केला आणि सैन्य कमांडर इन चीफ मिन आंग लाइंग यांच्याकडे देशाच्या सत्तेची सुत्रे आली. जनरल मिन सत्तेवर आल्याने चीनची झोप उडाल्याचे दिसत आहे. यामुळेच, म्यानमारमधील सत्तापालटावर चीनने अत्यंत थंड प्रतिक्रिया दिली आहे. म्यानमारचे लष्कर प्रमुख जनरल मिन यांचे चीनशी जवळचे संबंध आहेत. मात्र, ते पाकिस्तानी लष्कर प्रमुखांप्रमाणे गुलामगिरी करत नाहीत. जनरल मिन यांचे चीनचा मोठा शत्रू असलेल्या भारताशी जवळचे संबंध आहेत. यामुळेच आंग सांग सू की यांना आपल्याकडून वळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या चीनची झोप उडाली आहे. म्यानमारमधील सत्तापालटावर बोलताना चिनी परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ता म्हणाले, 'म्यानमारमध्ये जे घडले त्याची नोंद आम्ही घेतली आहे, तसेच आम्ही परिस्थितीसंदर्भात माहिती मिळवत आहोत. चीन, म्यानमारचा मित्र तथा शेजारी आहे. आम्हाला आशा आहे, की म्यानमारमध्ये सर्व पक्ष संविधान आणि कायद्याच्या चौकटीत राहून आपले मतभेज संपवतील. तसेच तेथे राजकीय आणि सामाजिक स्थिरता कायम ठेवायला हवी.' चीनच्या या प्रतिक्रियेकडे आता संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे. आंग सांग सू की एनएलडी सरकारला होते चीनचे समर्थन - चीन आणि म्यानमार संबंधातील तज्ज्ञ यून सुन यांनी व्हॉइस ऑफ अमेरिका यांच्याशी बोलताना म्हटले आहे की, चीनची प्रतिक्रिया अपेक्षितच होती. आम्हाला माहित आहे की चीन कुठल्याही देशाच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करत नाही. यामुळे त्यांच्याकडून लष्कराची निंदा करण्याची अपेक्षा नव्हती. चीन सातत्याने अशाच प्रकारची भूमिका घेतो. यून सुन म्हाणाले, हे सत्तांतर निश्चितपणे चीनच्या राष्ट्रीय हितांना नुकसान पोहोचवणारे आहे. लक्षात असू द्या की, चीनच्या स्टेट काउंसलर वांग यी यांनी नुकतीच आंग सांग सू की एनएलडी सरकारला पूर्ण समर्थन दिले होते. यून सुन म्हणाले, वांग यी यांनी म्हटले होते, की चीन एनएलडी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात आंग सांग सू की यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे. चीनने म्यानमारमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. चीन-म्यानमार आर्थिक कॉरिडोर पुढे नेण्याची चीनची इच्छा आहे. मात्र, गत महिन्याच्या तुलनेत चीनसाठी यासंदर्भात अनिश्चिततेची स्थिती निर्माण होत आहे. सुन म्हणाले, या सत्तापालटामुळे म्यानमारमधील चिनी गुंतवणूक आणि चीनच्या आर्थिक कामकाजावर धोक्याची घंटा वाजत आहे. सुन म्हणाले, चीनसाठी अंतर्गत राजकीय अस्थिरतादेखील एक राजकीय ओझे झाले आहे. कारण आम्हाला माहीत आहे, की म्यानमारच्या शक्तिशाली सेन्याविरोधात चीन काहीही करू शकत नाही. उलट... ...चीनला आंतरराष्ट्रीय स्थरावर म्यानमारच्या सैन्याचा बचाव करावा लागेल. यामुळेच म्यानमारचे सेन्य सत्तापालट चीनसाठी एक ओझे ठरले आहे. सुरक्षा परिषदेत या सत्तापालटावर चर्चा होईल आणि हे चीनसाठी चांगले वृत्त नाही, असेही सुन यांनी म्हटले आहे. चीनची मोठी गुंतवणूक - चीनने म्यानमारमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. चीनने येथे खाणकाम, पायाभूत सुविधा आणि गॅस पाइपलाइन प्रकल्पात अज्बावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. गेल्या वर्षी राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी म्यानमार दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी 33 प्रोजेक्ट्सवर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. यात 13 इन्फ्रास्टक्चरशी संबंधित होते. चीनने म्यानमारच्या राजकारणातही महत्वाची भूमिका बजावली आहे. यापूर्वीच्या लष्करी सरकारसोबतही चीनचे चांगले संबंध होते. तसेच आंग सान सू की यांच्याशीही चीनचे चांगलेच संबंध होते.टॅग्स :म्यानमारचीनशी जिनपिंगसैनिकMyanmarchinaXi JinpingSoldier