China Pakistan Plans To Surround India In Indian Ocean And Arabian Sea
समुद्रामध्ये चीन आणि पाकिस्तानच्या कुरापती; भारताला घेरण्यासाठी ‘असा’ बनवला प्लॅन By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 07:27 PM2020-08-13T19:27:51+5:302020-08-13T19:32:35+5:30Join usJoin usNext पाकिस्तान आणि चीन मिळून भारताला घेरण्यासाठी तयारी करत असल्याची माहिती आहे. काही दिवसांत चीनचे राष्ट्राध्यक्ष पाकिस्तानला भेट देणार आहेत. दरम्यान, चीन आणि पाकिस्तान यांच्यातील संरक्षण संबंध आणखी मजबूत करण्यासाठी शस्त्रास्त्रांचा एक नवा करार देखील होणार आहे. त्याच बरोबर दोन्ही देश समुद्री मार्गाने भारताच्या सुरक्षेला आव्हान देण्याचा प्रयत्न करीत आहेत. वृत्तानुसार चीन आणि पाकिस्तान एकत्रितपणे ग्वादर ते आफ्रिकेतील जिबूतीपर्यंत नौदल गस्त वाढवण्याच्या तयारीत आहेत. त्याच्या पेट्रोलिंग मार्गामुळे होर्मूझ जल क्षेत्राचा परिसरही व्यापला जाईल. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी (आयईए) च्या मते जगभरात निर्यातीत एकूण कच्च्या तेलापैकी ४० ते ४६ टक्के उत्पादन 'होर्मूझ जल क्षेत्र' या प्रदेशातून होते. चीन आणि पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीत भारतासह जगाची तेलपुरवठा बंद करु शकतात. अब्जावधी डॉलर्सच्या शस्त्राच्या मदतीने चीन आता संपूर्ण पाकिस्तानी नौदलाचा रंग बदलणार आहे. चीन आणि पाकिस्तानमधील नौदल संबंधही झपाट्याने वाढले आहेत. एप्रिलमध्येच चीन आणि पाकिस्तानने अरबी समुद्रात नौदलाचा अभ्यास केला होता. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या उपग्रह छायाचित्रांमधून असेही समोर आले आहे की पाकिस्तानने चिनी युद्धनौकेच्या संरक्षणासाठी अॅगोस्टा -१९ बी प्रकारची डिझेल इलेक्ट्रिक अटॅक पाणबुडी तैनात केली होती. फ्रेंच मूळची ही पाणबुडी बाबर -3 आण्विक क्षेपणास्त्र प्रक्षेपित करण्यास सक्षम आहे. पाकिस्तानी नौदल आपली ताकद वाढविण्यासाठी चिनी डिझाइनवर आधारित 039B युआन वर्ग पाणबुडी खरेदी करीत आहे. ही डीझल इलेक्ट्रिक चिनी पाणबुडी पाकिस्तानच्या नौदलाची शक्ती वाढविण्यास सक्षम आहे. ज्यात एंटी-शिप क्रूझ क्षेपणास्त्रे आहेत. एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन सिस्टममुळे ही पाणबुडी कमी आवाज निर्माण करते. ज्यामुळे पाण्याखाली शोधणे फार कठीण आहे. याव्यतिरिक्त, चीन पाकिस्तानला टाइप-54 ए मल्टीपर्पज स्टील फ्रीगेट्स ऑफर करीत आहे जे रडारला चकमा देण्यास सक्षम आहे. याशिवाय चीन इतर अनेक शस्त्रे पाकिस्तान नौदलाला देत आहे. यासाठी पाकिस्तानने चीनबरोबर 7 अब्ज डॉलर्सचा करार केला होता. पाकिस्तान आता आपले 70 टक्के शस्त्रे चीनकडून खरेदी करीत आहे. याव्यतिरिक्त, जिबूती, ग्वादर आणि मालदीव येथे नौदल तळ तयार करण्याची चीनची तयारी आहे. नौदल तळ बनविण्यामुळे चीनला आपले लष्करी उपकरणे कोठेही पाठविणे सोपे होईल. दक्षिण चीन समुद्र ताब्यात घेतल्यानंतर चीन दक्षिण आशियावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे. पाकिस्तान नौदलाकडे सध्या केवळ नऊ फ्रीगेट्स, पाच पाणबुड्या आणि 10 क्षेपणास्त्र नौका आणि तीन मायन्सव्हीपर्स आहेत. चीनकडून युद्धनौका मिळाल्यामुळे पाकिस्तानी नौदल खूप प्राणघातक होईल. ही युद्धनौका 4000 समुद्री मैलांपर्यंत हल्ला करू शकते आणि या जमिनीवरुन हवा आणि एंटी-सबमरीन क्षेपणास्त्रांनी सज्ज आहेत. २०२१-२३ दरम्यान पाकिस्तानला ही शस्त्रे मिळतील. पाकिस्तानला चिनी युआन वर्ग पाणबुडी ही जगातील शांततामय पाणबुडींपैकी एक आहे. या ८ मधील ४ २०२३ मध्ये पाकिस्तानला मिळतील.Read in Englishटॅग्स :भारतपाकिस्तानचीनIndiaPakistanchina