WHO ला तपासापासून रोखतंय चीन? पडद्याआडून केली चलाखी By मोरेश्वर येरम | Published: January 13, 2021 10:29 PM 2021-01-13T22:29:41+5:30 2021-01-13T22:37:10+5:30
कोरोना व्हायरसच्या उगमावर संशोधन आणि तापस करण्यासाठी जागितक आरोग्य संघटनेचं (WHO) पथक चीनमध्ये दाखल होणार आहे. पण त्याआधीच चीनच्या नकारात्मक भूमिकेमुळे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. जाणून घेऊयात चीन नेमकं काय करतंय?... WHO च्या पथकाला क्वारंटाइन करणार चीन WHO चं १० सदस्यांचं एक पथक गुरुवारी चीनमध्ये जाण्यासाठी निघणार आहे. पण कोरोनाच्या उद्रेकाच्या १ वर्षानंतर WHO चं पथक चीनमध्ये जाणार असल्याच्या मुद्द्यावरुनही टीका केली जात आहे. या पथकातील सदस्यांना चीनकडून १४ दिवसांसाठी क्वारंटाइन केलं जाणार आहे.
'डब्ल्यूएचओ'चं पथक चीनमध्ये दाखल होण्याच्या नेमकं एक दिवस आधीच चीनने वुहानमध्ये पुन्हा लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे या पथकाला वुहानमध्ये नेमका तपास तरी करता येणार आहे का? असा सवाल उपस्थित झाला आहे.
कोरोनाच्या विषाणूवर अभ्यास करण्यासाठी आणि त्यासाठी आवश्यक अशी सर्व मदत करण्याची तयारी चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दाखवली खरी, पण डब्ल्यूएचओच्या तज्ज्ञांच्या पथकाला वुहान इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजीमध्ये जाऊ देणार का? याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अनेक वैज्ञानिकांनी वुहानच्या याच प्रयोगशाळेतून कोरोनाचा प्रसार झाल्याचा आरोप केला होता.
डब्ल्यूएचओच्या तज्ज्ञांच्या पथकाला चीनकडून मोकळेपणाने तपास करू दिला जाईल का? याबाबतही शंका आहे. तज्ज्ञांच्या पथकावर आणि त्यांच्या तपासावर चीनकडून करडी नजर ठेवली जाईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
'डब्ल्यूएचओ'च्या पथकाला चीनमध्ये येण्यास आवश्यक अशा परवानगी न दिल्यामुळे 'डब्ल्यूएओ'चे अध्यक्ष टेड्रोस घेब्रेसेस यांनी चीन सरकारवर जोरदार टीका केली होती.
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगभरात आतापर्यंत १९ लाखांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. पण अजूनही या व्हायरसच्या प्रसाराचं मूळ केंद्र आणि कारण कळू शकलेलं नाही.
'डब्ल्यूएचओ'कडून चीनची बाजू घेतली जात असल्याचाही आरोप वारंवार करण्यात आला आहे. दरम्यान, 'डब्ल्यूएचओ'चं जे पथक चीनमध्ये तपासासाठी दाखल होणार आहे. त्यातही चीनच्या मर्जीतल्या संशोधकांची निवड करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.